आष्टी (बीड): कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाने पुन्हा लाॅकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. मंगळवारी (ता. 16) आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांची एंटीजन टेस्ट केली असता त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून RTPC नमुना घेऊन लॅबला पाठविला आहे. गेल्या चार दिवसापासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्व नागरीकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन आजबे यांनी केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सर्दी असल्याने मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने आमदार बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ येथील निवासस्थानी एंटीजन टेस्ट घेतली. यामध्ये त्यांचा पाॅझिटिव्ह अहवाल असून, आ.आजबे यांना कसलाही त्रास नाही. पुन्हा त्यांचा RTPC करून हा अहवाल अंबाजोगाई येथील लॅबला पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल आज दुपार पर्यांत येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
माझा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला असून, मला कसलाही ञास नाही. पण गेल्या चार दिवसांपासून माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांना कसलाही त्रास असो किंवा नसो त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन आ.बाळासाहेब आजबे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.