Beed Lok Sabha Election: बीड लोकसभा निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण निर्णायक; कोण जाणार दिल्लीत?

Beed Lok Sabha Election: राज्यातील काही प्रमुख लढतीपैकी एक असलेल्या बीड मतदारसंघाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. अनेक मुद्यावरून सध्या बीड मतदारसंघ चर्चेत आहे.
Beed Lok Sabha Election
Beed Lok Sabha ElectionEsakal
Updated on

राज्यातील काही प्रमुख लढतीपैकी एक असलेल्या बीड मतदारसंघाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. अनेक मुद्यावरून सध्या बीड मतदारसंघ चर्चेत आहे. गेल्या टर्ममध्ये खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून यावेळी पंकजा मुंडे यांना भाजपने खासदारकीसाठी रिंगणात उभं केलं आहे. तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे बजरंग सोनावणे हे हे उमेदवार आहेत. या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणारा मुद्दा आहे तो मराठा आरक्षणाचा.

या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड मतदारसंघामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष दिसून येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा देखील प्रभाव काही प्रमाणात दिसून येण्याची शक्यता आहे. राज्यभरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी निवडणूक होताना दिसत असली तरी मात्र, बीड लोकसभा मतदारसंघ याला अपवाद ठरताना दिसत आहे.

बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी मतांची विभागणी झाल्याचं बोललं जात आहे. मराठा आरक्षणाच्या मोठ्या फॅक्टरमुळे यंदा ही लढाई टफ झालीय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मराठा आरक्षण हा मुद्दा यावेळी पंकजा मुंडेंची डोकेदुखी ठरू शकतो. दरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बीडमध्ये ओबीसींचे नेतृत्व आहे. अशातच आता ओबीसी विरोधात मराठा एकवटला असल्याचं जाणकारांचं मत आहे.

Beed Lok Sabha Election
Sharad Pawar : बजरंग सोनवणेंचा शरद पवार गटामध्ये प्रवेश; पंकजा मुंडेंच्या विरोधात पवारांचा उमेदवार?

तर २०१९ मध्ये निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनावणे विरूध्द प्रीतम मुंडे अशी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीवेळी आमदार धनंजय मुंडे यांनी आपली संपुर्ण ताकद लावली होती. त्यामुळे २०१९ मध्ये मुंडे विरूध्द मुंडे असाच सामना दिसून आला होता. मात्र, यावेळचे चित्र वेगळे आहे, अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर राज्यातील राजकारणाचं चित्र पालटलं.

गेल्या निवडणुकीत विरोधात लढलेले मुंडे भाऊ-बहिण यावेळी सोबत फिरताना, प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना या गोष्टीचा फायदा होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये असलेली निवडणुकीची सर्वच समीकरण यावेळी बदलेली दिसून आली.

Beed Lok Sabha Election
Pankaja Munde : ''पंकजा मुंडेंनी बीड सांभाळावं'' छगन भुजबळांचा पंकजांना सल्ला; म्हणाले...

बीड मतदारसंघातील हे मुद्दे ठरू शकतात निर्णायक

मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदु ठरलेल्या बीडमध्ये काही हिंसक घटना घडल्या त्याचे पडसाद दिसू शकतात.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने सगोसोयरे, मराठा तरुणांवर गुन्हे आदी निर्णय प्रलंबित

सलग १० वर्षे सत्ता असून जिव्हाळ्याचा नगर- बीड- परळी रेल्वेमार्ग अपूर्ण.

शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव, सोयाबीनचे दर, ऊस उत्पादक, कापूस उत्पादक यांचे प्रश्न.

त्याचबरोबर ऊसतोड मजुरांचा मुद्दाही बीडमध्ये अनेक दशकांपासूनचा चर्चेत आहे.

Beed Lok Sabha Election
Narhari zirwal: झिरवळ अजितदादांसोबतच! मविआच्या उमेदवारासोबतच्या व्हायरल फोटोबाबत केला खुलासा म्हणाले, "लोकांच्या आग्रहाखातर...."

त्याचबरोबर बीड जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. जे आतापर्यंत सुटलेले नाहीत. पाणीप्रश्न, दुष्काळ, शेतकरी, शिक्षण, रोजगार, यासह आता चर्चेत आलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो.

दरम्यान दोन्ही उमेदवारांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत मुंडे विरूध्द मुंडे असा सामना दिसणार नसला तरी अनेक मोठ्या मुद्यावरून बीडकर कोणाला दिल्लीत जाण्याची संधी देतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Beed Lok Sabha Election
Suresh Jain: निवडणूकीच्या तोंडावर सुरेश जैन यांची राजकीय निवृत्ती चर्चेत; आघाडीसाठी धक्का, महायुतीसाठी लाभदायी; निर्णयाचे कारण अनुत्तरितच

बीडमधील जातनिहाय आकडेवारी

बीड जिल्ह्यातील जातनिहाय मतांची आकडेवारी अंदाजे

मराठा - सात ते साडेसात लाख

वंजारी - साडेचार ते पाच लाख

दलित - दोन ते सव्वा दोन लाख

मुस्लिम - सव्वा दोन ते अडीच लाख

ओबीसी - म्हणजेच माळी आणि धनगर दोन ते अडीच लाख

असे बीड जिल्ह्यात 21 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.