बीड : मांजरा धरण शंभर टक्के भरले

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते जलपूजन
esakal
esakalsakal
Updated on

केज : बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले व शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेले मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या धरणाचे जलपूजन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

esakal
पैठणमधील 'खेर्डा'च्या सांडव्याला गळती,प्रकल्प उन्हाळ्यात कोरडा?

तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या सिंचन क्षेत्राखाली येणाऱ्या‌ ग्रीनबेल्टचा खरा आधार हा मांजरा धरण आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने मुबलक पाणीसाठा होऊन धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी राहुल सोनवणे, हनुमंत मोरे, प्रवीणकुमार शेप, पशुपतिनाथ दांगट, दलिल इनामदार आदी उपस्थित होते.

पूर्ण क्षमतेची हॅट्ट्रीक

मांजरा धरण सलग तिसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरले. आतापर्यंत १६ वेळेस भरले आहे. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने याही वर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे. कदाचित धरण भरले नसते तर ग्रीनबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना ऊस मोडण्याची वेळ आली असती.

मात्र, मुबलक पाणीसाठा असल्याने सिंचन व पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळण्यासाठी कालव्यातून पाणी ठरलेल्या नियमानुसार व नियमितपणे सोडण्याच्या सूचना देशमुख यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.