Beed News : सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे अयोग्य :आक्रोश आंदोलन

शासनाने तुघलकी निर्णय रद्द करावा
Beed News
Beed NewsSakal
Updated on

बीड : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी स्वरूपावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती आदेश हा डीएडबीएड असणाऱ्या लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांचा रोजगार हिरावून घेणारा व स्थानिक स्वराज्य संस्थांतील शिक्षण व्यवस्था उद्धव करणारा आहे.

हा निर्णय तत्काळ रद्द करावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमध्ये समायोजन करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Beed News
Beed District Hospital : मनुष्यबळ अपुरे पण तज्ज्ञांची पदे मात्र रिक्त, जिल्हा रुग्णालयात नेमकं चाललंय काय

निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात शेख युनुस, बलभीम उबाळे, शेख मुश्ताक, शेख मुबीन, संजय पावले, आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, रामधन जमाले, धनंजय सानप, कालिदास वनवे, अशोक सानप, दिपक बांगर, राहुल थिटे, प्रदिप नेवळे, मच्छिंद्र आंधळे, श्रीकांत कवडे, नितीन कवडे, सुनील कवडे, लक्ष्मण कवडे आदींनी सहभाग घेतला. यावेळी निर्णय व शासनाच्या विरोधी घोषणा देण्यात आल्या.

Beed News
Mumbai : पावसामुळे लोकलचा वेग मंदावला! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना लेटमार्क !

सुशिक्षितांवर होणार अन्याय

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालयातील उपसचिव तुषार महाजन यांनी ७ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा शासन आदेश काढला. या निर्णयामुळे लाखो शिक्षण पदवी व पदाविकाधारकांवर अन्याय होणार आहे. त्याचे दुरगामी परीणाम गोरगरीब, वंचित, कष्टकरी, शेतकरी, मजुरांच्या बेरोजगार पाल्यांवर परिणाम करणारा आहे, असे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

Beed News
Sakal Vidya Edu Expo : प्रदर्शनातून करिअरची योग्य दिशा - आयुक्त शेखर सिंह

पवित्र पोर्टल नोंदणी प्रक्रिया तत्काळ सुरू करून रिक्त पदांच्या ८० टक्के (५५ हजार) शिक्षक भरती एकाच टप्प्यात केंद्रीय (विभागीय मेरीट न लावता) पद्धतीने करावी. पवित्र पोर्टल २०१७ ची प्रलंबित शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, बिंदु नामावलीमधील खुल्या प्रवर्गातील अनियमितता तत्काळ दुर करून खुल्या प्रवर्गातील जास्तीत जास्त जागा देण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

Beed News
Education Department : मास्तरांनो, एक चूक पडू शकते महागात! शाळेत तंबाखू, मद्यसेवन केल्याचे आढळल्यास थेट होणार कारवाई

सेवानिवृत्तांना अनेक मर्यादा

नोकरभरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांचे नोकरी आणि लग्नाचे वय सरून जात असून त्यांना खरी नोकरीची गरज आहे. अशा बेरोजगारांना डावलुन सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा नियुक्त करणे संयुक्तिक नसून सेवानिवृत्तांना अनेक मर्यादा पडतात. त्यांचे शरीर साथ देत नाही, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.