Beed News : मला शिकवणारे तुम्ही कोण? तुम्ही माझे मालक नाहीत, बोलायचे का नाही मी ठरवेन; सोनवणेंची मुस्लिम तरुणाशी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

साधारण ४ दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली विशाळगड येथून जवळ असलेल्या गजापूर घडलेल्या अप्रिय घटनेवरून मुस्लिम समाजात रोष आहे.
mp bajrang sonawane
mp bajrang sonawanesakal
Updated on

बीड - साधारण ४ दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली विशाळगड येथून जवळ असलेल्या गजापूर घडलेल्या अप्रिय घटनेवरून मुस्लिम समाजात रोष आहे. याचा सामना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना करावा लागलाय. घटनेला ४ दिवस उलटल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी याबाबत फेसबुक पोस्ट करून घटना निषेधार्य असल्याचे म्हटले आहे. मात्र यामागे दडले आहे, एका व्हायरल कॉल रेकॉर्डिंगचे कनेक्शन!

जिल्ह्यातील पाथरुड (ता. माजलगाव) येथील एका तरुणाने बजरंग सोनवणे यांना सेक्युलर विचाराचे म्हणून सबंध मुस्लिम समाजाने एकगठ्ठा मतदान दिले असल्याचा दावा केलाय. तर विशाळगड घटनेवरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून, संसदेचे सदस्य या नात्याने आपण साधा निषेधही व्यक्त केला नाही, असा जाबही विचारला आहे.

त्या व्हायरल कॉल मध्ये संबंधित तरुणाला खासदार सोनवणे यांनी 'देशात कुठे काही घटना घडली, तर त्याला मी जबाबदार आहे का? जिल्ह्यात काही घडलं तर मी बोलेन. मात्र, बाहेर घडलेल्या घनटनेवरून मला जाब विचारणारे तुम्ही कोण? तुम्ही माझे मालक नाहीत, कोणत्या विषयावर मी बोलायचे का नाही हे तुम्ही मला सांगणारे कोण? माझे मी ठरविन, मला जास्त बोलल्यास मी फोन कट करून टाकीन' अशा शब्दात सोनवणे व्यक्त झालेत.

मात्र ही कॉल रेकॉर्डिंग जिल्हाभरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, मुस्लिम समाजाच्या भावना बजरंग सोनवणे यांनी दुखावल्या असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत. विशाळगड घटनेच्या ४ दिवसांनंतर बजरंग सोनवणे यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.