Beed News: एक लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला अटक!

Latest Marathwada news : ९ टिप्पर चालकांसह ताब्यात घेतले होते तर ३ टिप्पर व एक पोकलेन पसार झाले होते.
Beed News: एक लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला अटक!
Updated on

Latest Crime News: अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अंतिम तडजोडअंती एक लाख रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले.

यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख स्वीकारतान बुधवारी (ता. २१ ) रोजी बीड एसीबीने मंडळ अधिकारी सचिन सानप याला रंगेहात पकडले या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Beed News: एक लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला अटक!
Beed Crime: विवाहिता आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा, वाचा जिल्ह्यात कुठे घडला प्रकार

बीड तालुक्यातील मोची पिंपळगाव शिवारात १३ ऑगस्ट रोजी पिंपळनेर पोलिसांनी अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या १२ टिप्परवर कारवाई केली होती. यावेळी ९ टिप्पर चालकांसह ताब्यात घेतले होते तर ३ टिप्पर व एक पोकलेन पसार झाले होते.

या प्रकरणात अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई महसूल प्रशासनाने सुरु केली होती. मात्र, यासाठी मुरुम उत्खनन कमी दाखवून कमी दंड करण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप याने मरुम उत्खनन करणाऱ्यांना २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दीड लाख रुपयांत हा सौदा ठरला होता.

Beed News: एक लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला अटक!
Beed: लहान भावाचे हाल नाही झाले सहन, मोठ्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू !

या प्रकरणी एसीबीकडे तक्रार केली होती. लाच मागणी पडताळणीनंतर बुधवारी तहसिल कार्यालयासमोरील एका हॉटेलात सापळा लावला होता. दीड लाखांपैकी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपये स्विकारताना मंडळ अधिकारी सचिन सानप याला एसीबीच्या पथकाने गजाआड केले. डीवायएसपी शंकर शिंदे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. यामुळे महसूल प्रशासनातील लाचखोरीचा मुद्दा समोर आला असून महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Beed News: एक लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला अटक!
Beed Success Story: शेतकऱ्याची पोरगी झाली फौजदार, गावकऱ्यांनी मिरवणूक काढत जेसीबीने केली फुलांची उधळण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.