Beed News : पारगावला गांजाची शेती; २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

संभाजी हरिभाऊ कराड असे गांजा शेतात लावणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
beed news
beed newssakal
Updated on

शिरूर कासार - शेतात गांजाची लागवड केल्याचे सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात समोर आले. छाप्यात पोलिसांनी तब्बल २७ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चकलांबा (ता. गेवराई) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. संभाजी हरिभाऊ कराड असे गांजा शेतात लावणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील घोगस पारगाव (ता. शिरूर कासार) येथील संभाजी हरिभाऊ कराड याने आपल्या शेतामध्ये गांजा लागवड केल्याची माहिती, सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली.

श्री. कुमावत यांच्यासह गेवराईचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू, परिवीक्षाधीन पोलिस उपअधीक्षक श्‍वेता खाडे, चकलांबाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे आदी अधिकाऱ्यांसह पथकाने छापा टाकाला. यावेळी शेतात पाच क्विंटल ५४ किलो गांजाची झाडे आढळून आली.

beed news
Beed News : स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाची दुरवस्था

पोलिसांनी जप्त केलेल्या या गांजाच्या झाडांची किंमत २७ लाख रुपये आहे. आरोपी संभाजी कराड याच्यावर फौजदार राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाईत फौजदार श्री. इंगळे, फौजदार श्री. तांदळे, फौजदार राजेश पाटील, फौजदार आनंद शिंदे, श्री. येडे, श्री. खेडकर, बालासाहेब डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंदे, संतोष गित्ते आदींचा समावेश होता.

beed news
Pankaja Munde : ‘परिक्रमेतील’ मुंडेशक्तीची भाजप श्रेष्ठींकडून दखल, राज्याच्या परिघात सक्रियतेची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.