गेवराई (बीड) : नगरपालिकेच्या वतीने शहरातील महिलांसाठी सर्व सोयीयुक्त जिम आणि तालुक्यातील नाट्य रसिकांसाठी सुसज्ज असे नाट्यगृह लवकरच उभारण्यात येणार असल्याचे, आमदार लक्ष्मण पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी बोलताना सांगितले.
रविवारी शहरातील नाईकनगर व दसरा मैदान येथे विविध विकासकामाचा शुभारंभ आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, जे.डी. शहा, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, राजेंद्र भंडारी, नगरसेवक राजेंद्र आर्दड, काशीनाथ पवार, भरत गायकवाड, धम्मपाल सौदरमल, जानमंहमद बागवान, बाळासाहेब सानप, बंडू येवले यांच्यासह आदींची उपस्थिती उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की, "शहरातील जनतेच्या सहभागाने पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता यांच्याही पलीकडे गेवराई शहर विकासाच्या बाबतीत आगेकूच करत आहे त्यामुळे लवकरच महिलांसाठी जिम व नाट्यगृह, उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे," असे आमदार पवार यांनी सांगितले.
यावेळी विठ्ठल मोटे, भाऊसाहेब बेदरे, बाबा वाघमारे, भगवान कदम,इम्रान पठान,राम पवार,सुधीर राठोड, भगवानराव जाधव, घोलप आण्णा, इनामदार, छगन गिरी, सुभाष गुजाळ, माऊली सुतार, विष्णू मोरे, विकास राठोड यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांचे सूत्रसंचलन प्रा.प्रल्हाद येळापुरे यांनी केले.
■ ई सकाळ वरील ताज्या बातम्या
ठाणे: कळव्यात गाळा देण्याच्या नावाने तिघांनी केली 50 लाखाची फसवणूक
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूकीची कोंडी
यवतमाळ: मतिमंद अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत
‘गळाभेट’ने पाषाणभिंतींना पाझर
चंद्रपूर: कावठी गावात बिबट्याची दहशत; बंदोबस्ताची मागणी
पुणे: पुरेसा पाऊस झाल्याने जुन्नरमध्ये भात लावणीची कामे सुरू
अभिनेता अमेय वाघ आणि साजिरी अडकले विवाहबंधनात
राहुल देशपांडे यांनी घातली विठाईला साद
चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार
शाहरूख-अनुष्का देणार पब्जना भेट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.