Beed News : मराठा आरक्षण आंदोलकांनी मारल्या गोदापात्रात उड्या, मुख्यमंत्र्यांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

मराठा आरक्षण जवळका येथे मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
beed news
beed news sakal
Updated on

गेवराई - मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांस पोलिसांकडून झालेला लाठी हल्ला मराठा आरक्षणास अधिक हिंसक करण्यास कारणीभूत ठरत असून, याचे पडसाद गेवराई तालुक्याच्या गोदा पट्यात जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलन करत जाळपोळ होत आहे.

गेवराई तालुक्यातील गुळज येथील शेकडो मराठा बांधवांनी गोदापात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची मनधरणी करत प्रशासकीय स्तरावर आपली बाजू मांडण्याची हमी दिल्यानंतर आंदोलनकर्ते तब्बल दीड तासाने गोदापात्रातून बाहेर आले.

beed news
Dr M S Gosawi Death : शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन; शरद पवारांनी घेतलं अंत्यदर्शन

तर, तालुक्यातील निपाणी जवळका येथील आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून पुतळे जाळून टाकले.

मागील काही दिवसांपासून अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणास हिंसक वळण लागल्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज अधिकच आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी बंद पुकारून आंदोलनास पाठिंबा देण्यात येत असून, काही ठिकाणी जाळपोळ होत आहे. गेवराई तालुक्यातील गोदाकाठाच्या पट्ट्यात या आंदोलनाची धग अधिक दिसून येत आहे.

दाकाठच्या गुळज गावात मुक्कामी असणारी बस आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकली तर धोंडराई फाटा येथे देखील बस जाळून टाकण्यात आली. अजून ही आंदोलक थांबले नसून ठिकठिकाणी मराठा समाज आंदोलन करत पाठिंबा दर्शवत असल्याचे दिसून येत आहे. गुळज व पंचक्रोशीतील शेकडो मराठा समाज बांधव रविवारी सकाळी थेट गुळज येथील नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यास उतरले. याची माहिती प्रशासनाला मिळताच घटनास्थळी मोठा पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला.

beed news
Sola Somvar Vrat: निज श्रावणात सोळा सोमवार व्रत प्रारंभ! अधिक मासात व्रतास निर्बंध, 14 वर्ष केले जाते व्रत

यावेळी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा आरक्षण मिळेपर्यंत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला असता याठिकाणी बीडचे अधिकारी व गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी धाव घेत आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करत प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी प्रशासनाची धावपळ झाल्याचे दिसून आले.

beed news
Jalna News : जालन्यातील बारा गावांत मिळाल्या कुणबी मराठा नोंदी

पोलिस प्रशासन सकाळीच गावात

पोलिस प्रशासन सकाळीच गुळज गावात दाखल झाले होते. यावेळी अग्निशामक दल, राज्य राखीव दलाची तुकडी, दंगल नियंत्रण पथक यासह रुग्णवाहिका याठिकाणी दाखल होती. तालुक्यातील निपाणी जवळका येथील मराठा समाज देखील आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. येथील आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करून पुतळे जाळून टाकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.