बीडमध्ये आंदोलन उग्र; राष्ट्रवादी अन् जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय पेटवलं, महामार्ग अडवले, आमदाराचं घर जाळलं

बीडमध्ये आंदोलन उग्र; राष्ट्रवादी अन् जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय पेटवलं, महामार्ग अडवले, आमदाराचं घर जाळलं
Updated on

बीड- बीडमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं आहे. मराठा समाज आक्रमक झाला असून सकाळी माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. संतप्त आंदोलकांनी त्यांचे घर आणि गाडी जाळली होती. त्यानंतर दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय जाळण्यात आले आहे.

जालना येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. त्याची धग बीडमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसभरात बीडमधील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी धुळे-सोलापूर महामार्ग अडवून धरला आहे. रस्त्यावर अडथळा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक खोळंबली आहे.

बीडमध्ये आंदोलन उग्र; राष्ट्रवादी अन् जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय पेटवलं, महामार्ग अडवले, आमदाराचं घर जाळलं
Kiran Mane on Manoj Jarange: "संविधान गुंडाळू पहाणाऱ्या या व्यवस्थेला..."; मराठा आरक्षणासंदर्भात किरण मानेंची रोखठोक पोस्ट चर्चेत

मराठा आंदोलकांनी बीड नगरपालिकेवरही दगडफेक केली आहे. अनेक नेत्यांचा ताफा अडवडण्याचा प्रयत्न आंदोलक करत आहेत. अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आले असून वातावरण तापलं आहे. येत्या काळात आंदोलन अधिक उग्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनापुढे कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान असणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे घर देखील आंदोलकर्त्यांनी पेटवलं आहे. त्यामुळे बीडमध्ये परिस्थिती स्फोटक बनली आहे. माहितीनुसार, बीडमध्येच मंत्री छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते सुभाष राऊत यांचं हॉटेल देखील आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिलं आहे. जिल्ह्यात पाच ते सहा ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बीडमध्ये मराठा आंदोलनाला वेगळे वळण मिळत असल्याचं दिसत आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.