Latest Marathwada News: आईच्या दहाव्या दिवशीच मुलाचेही निधन झाल्याची चुटपूट लावणारी एक घटना येथील संत सावता महाराज मंदिर परिसरातील अनंतपुरे गल्लीमध्ये शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी घडली. तारामती लक्ष्मण शिंदे (वय ८०) व बालाजी लक्ष्मण शिंदे (वय ५३), असे निधन झालेल्या माय-लेकराचे नाव आहे.
बालाजी शिंदे हे गणेशपार भागात बम्बईया या टोपण नावाने परिचित होते. स्कूल ऑटो चालक म्हणून मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते व्यवसाय करत होते. ऊन-पाऊस अथवा कितीही कडाक्याची थंडीही असली तरी पहाटे ५ वाजून ५ मिनिटाला शिंदे यांचा ऑटो सुरू व्हायचा. तीच त्यांची ओळख गल्लीतील रहिवाशांमध्ये ठसलेली होती.