Beed : स्फोट घडविण्याच्या तयारीतील तिघे गजाआड

परळी वीज केंद्राच्या राखेच्या तळ्यातील प्रकार, १०३ जिलेटीन कांड्या जप्त
Beed Parli Power Station bomb blast plan
Beed Parli Power Station bomb blast plan
Updated on

परळी वैजनाथ : प्रवेश निषिद्ध असलेल्या येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेच्या तळ्याजवळ जिलेटिन व इतर साहित्याद्वारे स्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या तिघांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील एकमेव असलेले येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र अतिसंवेदनशील आहे. या केंद्राची सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळली जाते. पास किंवा परवानगीशिवाय केंद्रात प्रवेश करता येत नाही. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेच्या वाहतूकीबाबतचे अनेक नियम धाब्यावर बसवले गेले. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राजवळच असलेल्या राखेच्या तळ्यात माफीया स्फोट घडवून राख उपसतात. शुक्रवारी (ता.२६) सायंकाळी असाच स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षारक्षकांनी पकडले. त्यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा केला.

त्यांच्याकडून जिलेटिनच्या १०३ कांड्या, १५० तोटे, बॅटरी, वायर असे स्फोटाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वीज निर्मिती केंद्र परिसराला आमची सुरक्षा नाही. ती वीज केंद्रातील सुरक्षारक्षकांची असल्याचे ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारोती मुंडे यांनी सांगितले.

हे तिघे ताब्यात

औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेच्या ठिकाणी स्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या मारोती काचगुंडे (वय ४०), हरिश्चंद्र तुकाराम जाधव (३९) व बालाजी लालू चव्हाण (४०, तिघेही परळी तालुक्यातील) या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

स्फोटके जप्त केलेल्या ठिकाणापासून औष्णिक वीज निर्मिती केंद्र दोन ते अडीच किलोमीटरवर आहे. त्यामुळे केंद्राला धोका नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. वीज केंद्राची सुरक्षा व्यवस्था चोख कर्तव्य बजावत आहे.

- मोहन आव्हाड, मुख्य अभियंता, औष्णिक वीज केंद्र, परळी

औष्णिक वीज केंद्रातून बाहेर पडणारी राख केंद्राजवळच असलेल्या दाऊदपूर येथील तळ्यात सोडली जाते. सध्या तळ्यातील राख संपली आहे. कुठेतरी शिल्लक राहिलेली राख वीटभट्या चालक जिलेटिनच्या कांड्याद्वारे स्फोट घडवून ती मोकळी करतात व घेऊन जातात. यासाठीच जिलेटिनच्या कांड्या आणल्या असण्याची शक्यता आहे.

-मारोती मुंडे, प्रभारी पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.