Beed : शिरूर कासारच्या पोलिसावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
 police bribed
police bribed esakal
Updated on

बीड : अदखलपात्र गुन्ह्यात मदत करतो, म्हणत तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून पाच हजार रुपयांवर तडजोड केली. यावरुन शिरूर कासार येथील पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुरुवारी या विभागाच्या पथकाने सापळा रचला.

 police bribed
Crime news : संभाजीनगर हादरलं! विवाहित महिलेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक बलात्कार

मात्र, संशय आल्याने लाच मागणाऱ्या व स्वीकारण्याचे मान्य करणाऱ्या शिवाजी श्रीराम सानप या पोलिस कर्मचाऱ्याने लाच स्वीकारली नाही. पण लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने गुन्हा नोंद झाला आहे.

प्रवृत्त करणाऱ्यावरही गुन्हा

वडवणी येथे मंगळवारी (ता. २०) असाच अदखलपात्र गुन्हा निकाली काढण्यासाठी हवालदार रेवननाथ रायबा गंगावणे याने एका शिक्षकाकडून ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचखोर पोलिसाला दहा हजार रुपये स्वीकारताना धाराशिव येथील एसीबी पथकाने अटक केली होती. तक्रारदार हा शिक्षक असून त्याच्या भावाचा एकासोबत जमिनीचा वाद होता.

 police bribed
Crime news : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणाला कारावास, दंड

त्याने शिक्षकावरही अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता. दरम्यान, प्रकरणात लाच देण्यास प्रवृत्त केल्यावरून प्रदीप शेळके (रा. उपळी, ता. वडवणी) याच्यावरही गुन्हा नोंद झाला आहे. त्यानेच शिक्षकाला लाच देण्यास प्रवृत्त केले होते, असे विभागातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.