Beed Rain News : बीडमधील शनीचे मंदिर पाण्यात! गेवराई नदीकाठावरील ३२ गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गेल्या दोन नाशिक तसेच दिवसांपासून पाऊस सुरू असून जायकवाडी प्रकल्पाच्या वरिल भागात पाऊस झाल्याने वरिल धरणातून नाथसागरात पाणी विसर्ग करण्यात आला आहे.
Beed Rain News
Beed Rain Newssakal
Updated on

जातेगाव(जि.बीड) : पैठण येथील जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ३ फुटाने उघडले होते.शुक्रवारी पहाटे वरिल धरणातून आवक कमी झाल्याने नाथजलाशयाचे १८ दरवाजे दोन फुटाने खुले करून सद्यपरिस्थितीत गोदापात्रात ३७ हजार पेक्षा जास्त क्युसेसने पाण्याच्या विसर्ग होत असल्याने बीडमधील गेवराईतील राक्षसभूवनचे शनी मंदिर पाण्यात आले असून, नदी काठावरील ३२ गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन नाशिक तसेच दिवसांपासून पाऊस सुरू असून जायकवाडी प्रकल्पाच्या वरिल भागात पाऊस झाल्याने वरिल धरणातून नाथसागरात पाणी विसर्ग करण्यात आला आहे. पैठणचे नाथ जलाशय हे शंभर टक्के भरल्याने बुधवारी गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले होते.

मात्र,नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू गुरुवारी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान, जायकवाडीच्या धरणाचे दरवाजे १० ते २७ अशा एकूण १८ दरवाज्यातून ३ फुट उंचीवर उघडुन गुरुवारी दुपारी ५६ हजार ५९२ क्युसेक जलविसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला.

शुक्रवारी पहाटे पुन्हा वाढ करण्यात आल्याने सध्या गोदावरी नदीमध्ये ७६ हजार क्युसेस पाणी विसर्ग करण्यात येत असताना वरिल आवक कमी होताच पुन्हा विसर्ग कमी करण्यात आला असून, सद्यपरिस्थितीत नाथ जलाशयातून ३७ हजार ७२८ क्युसेसने पाणी विसर्ग सुरु आहे.गेवराई तालुक्यातील भारतातील साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेले श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील शनी मंदीरात पाणी आले आहे.

दरम्यान गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पाथरवाला बुद्रुक, गुळज,पांचाळेश्वर, राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव, आगर नांदूर, खामगाव, संगम जळगाव, हिंगणगाव, गोंदी सह ३२ गावातील नागरिकांना महसूल प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आवक बघुन कमी जास्त प्रमाणात विसर्ग होणार असल्याने गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे.

- संजय सोनवणे, नायब तहसीलदार गेवराई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.