Beed Rain: सकल भागात पाणी; घरातील साहित्याचे नुकसान, नागरिक त्रस्त

Latest MArathawada News: मुसळधार पावसामुळे जुन्या गावभागातील श्री शनी मंदिर परिसरात व अंबेवेस येथे पाणी साचले आहे.
Beed Rain Water in gross area; Damage to household materials, citizens suffering marathawada
Beed Rain Water in gross area; Damage to household materials, citizens suffering marathawadasakal
Updated on

Parali vaijyanath: शहरातील सरस्वती नदीला व ओढ्याला पाणी आल्याने सकल भागात पाणी शिरल्याने घरासह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून या भागातील अनेक नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

शहरातील जुन्या गावभागातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला आलेल्या पुरामुळे तुळजाईनगर, नरहरी महाराज मंदिर परिसर, किर्तीनगर, गंगासागर नगर, बरकतनगरसह सरस्वती नदीच्या काठावर असलेल्या सकल भागात पाणी शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने बरकतनगर मधील रहिवाशांना इतरत्र हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.०३) पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे जुन्या गावभागातील श्री शनी मंदिर परिसरात व अंबेवेस येथे पाणी साचले आहे.

Beed Rain Water in gross area; Damage to household materials, citizens suffering marathawada
Beed Rain Update: बीडमध्ये बिंदुसरा धरणावर हुल्लडबाज तरुणांचा राडा; रील्स-फोटोसाठी जीवघेणे स्टंट, पाहा Video

सरस्वती नदीवर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ऐन पात्रात दुकाने काढल्याने या पात्रात मुसळधार पावसामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर आले या पात्रात पाणी न बसल्याने सकल भागात पाणी शिरले व पुर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे तुळजाईनगर, नरहरी महाराज मंदिर परिसर, किर्तीनगर, गंगासागर नगर, बरकतनगर परिसरातील घरात गुडघ्याच्यावर पाणी साचले होते यामुळे घरातील संसारपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शहरू,शाळा महाविद्यालयाला अघोषित सुट्टी होती. नगरपालिका प्रशासन, महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

Beed Rain Water in gross area; Damage to household materials, citizens suffering marathawada
Beed Rain : हिवरा, देवळा परिसरात तुफान पाऊस! कांबळी नदीला पूर; पिके उद्ध्वस्त, पूल, रस्ते उखडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.