Beed: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी मतदार संघातील घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे मतदान केंद्रावर तोडफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी जवळपास 40 जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रत्येक निवडणुकीत परळी मतदार संघ कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही परळी मतदार संघात राडा झाला. महाविकास आघाडीचे नेते ऍड. माधव जाधव यांना कन्हेरवाडी येथे मारहाण करण्यात आली. व्हिडीओ व्हायरल होताच या मारहाणीचे पडसाद संपूर्ण मतदार संघात उमटले.