बीड : वर्गखोल्या कमी, विद्यार्थ्यांचे नुकसान

ठाकर आडगाव शाळेत पहिली-सातवीचे विद्यार्थी, खोल्या मात्र तीनच
Beed Thacker Adgaon school only three classrooms
Beed Thacker Adgaon school only three classrooms
Updated on

गेवराई : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकर आडगाव येथील पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सव्वाशे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आठ शिक्षक आहेत. मात्र,विद्यार्थ्यांना बसण्यासाठी फक्त तीन वर्ग खोल्या असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांतून संताप व्यक्त होत आहे.

प्राथमिक शिक्षणाची विद्यार्थ्यांना गोडी लागावी या अनुषंगाने शिक्षण विभाग शालेय पोषण आहार, गणवेश, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक संच आदी उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यास प्राथमिक शिक्षणाची गोडी लागावी हाच उद्देश असलेल्या शिक्षण विभाग वर्गखोल्यांबाबत मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे. जातेगाव, रोहीतळ केंद्रातील बहुतांश घटक शाळांना वर्ग खोल्या अपुऱ्या असल्याने प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी संख्येला यंदा गळती लागली. यामध्ये ठाकर आडगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची वर्गखोल्यांअभावी दयनीय अवस्था झालेली आहे.

ठाकर आडगाव येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ११० विद्यार्थी असून आठ शिक्षक आहेत. मात्र शाळेतील या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्या फक्त तीनच आहेत. यामुळे एक ते चार वर्ग आणि पाच ते सात असे एकत्र वर्ग भरवत संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची कसरत शिक्षकांना करावी लागत आहे. याशिवाय शालेय परिसरात पाण्याचे तळे साचते. शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठाकर आडगाव येथील प्राथमिक शाळेसाठी वर्गखोल्यांबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आलेल्या आहे. येथे तीन वर्गखोल्या मंजूर झाल्या आहेत. निधी उपलब्ध होताच येथील वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येईल.

- रामराम पवार, मुख्याध्यापक, ठाकर आडगाव

एकेकाळी आदर्श शाळा म्हणून ठाकर आडगाव प्राथमिक शाळा रोहीतळ केंद्रात गणली जात होती. मात्र, येथील शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बसण्यास वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

-संदीप कोकाट, नागरिक, ठाकर आडगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.