बीड : पावसाळ्याचे अडीच महिने लोटून जात आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस असला तरी मोठे पाऊस न पडल्याने प्रकल्पांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही. बीड शहराला पाणीपुरवठा असणाऱ्या बिंदुसरा व माजलगाव दोन्ही धरणांतील पाणीसाठा बीडकरांच्या चिंतेत भर टाकणारा आहे. दोन्ही प्रकल्पांतील पाणी जोत्याखालीच आहे.