Beed Water Crisis : बीड जिल्ह्यात पाऊस ६२ टक्के, मात्र जलप्रकल्पांत साठा केवळ ६ टक्के

Beed latest News In Marathi |सर्व प्रकल्प मृतसाठ्यात गेल्याने धरणे भरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता
Beed Water storage in water projects 6 percent only weather update rain monsoon
Beed Water storage in water projects 6 percent only weather update rain monsoonSakal
Updated on

बीड : मान्सून सुरू झाल्यापासून सर्व तालुक्यामध्ये पावसाने चांगली हजेरी लावली असून जिल्ह्यात आत्तापर्यंत ३५२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरीच्या तुलनेत ६२.३ टक्के पाऊस पडला असून जिल्ह्यातील जलसाठ्यांत मात्र ६.४९ टक्के इतकीच वाढ झालेली आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पमंमध्ये ४६.४४५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकऱ्याच्या हातून दोन्ही हंगामातील पिके गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते. गेल्या काही वर्षापासून निसर्गाचे चक्र बिघडल्याने वेळेवर पाऊस पडत नव्हता सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने पेरण्या वेळेत होत नव्हत्या तर परतीचा पाऊस जोरदार होऊन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान करून जात होता.

यंदा मात्र जुनच्या पहिल्याच आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मूग, उडीद पेरणीला संधी मिळाली असून यंदा या दोन्ही पिकांचा पेरा वाढला आहे. परंतु जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पामधील साठ्यांत समाधानकारक वाढ झालेली नाहीये.

जिल्ह्यातील पावसाची एकूण वार्षिक सरासरी ५६६.१ मिमी आहे. यापैकी आतापर्यंत ३५२.८ मिमी पावसाची नोंद झालेली आहे म्हणजेच एकूण सरासरीच्या ६२.४९ टक्के पाऊस झालेला आहे. मात्र जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पातील जलसाठ्यांत मात्र वाढ झालेली नाहीये. जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत केवळ ४६.४४५ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून एकूण पाणीसाठया पैकी हा साठा केवळ ४.६९ टक्के आहे.

सोमवारपर्यंत झालेला एकूण पाऊस

बीड - ३४०.६ मिमी, पाटोदा - ४१०.८ मिमी, आष्टी - ३६५ मिमी, गेवराई - ३४७.५ मिमी, माजलगाव- ३३८ मिमी, अंबाजोगाई - ३९९.८ मिमी, केज- ३२४.४ मिमी , परळी- ३५२.७ मिमी , धारूर - ३५१ मिमी , वडवणी -३२५ मिमी , शिरूर कासार - ३५१.७ मिमी.

पिकांना दिलासा

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामसाठी एकूण ७ लाख ८५ हजार ७८६ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. या क्षेत्रावर जवळपास पेरण्या पूर्ण झाल्या झाल्या आहेत. यंदा शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, सोबतच उडीद आणि तूर या पिकांना पसंती दिली आहे. तसेच मुग आणि बाजरी या पिकांचा देखील चांगला पेरा झालेला आहे. पाऊस ही समाधानकारक असल्याने त्याचा पिकांना फायदा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.