या आगीत देशी-विदेशी दारुच्या बाटल्या फुटल्याने आगीने अधिक भडका घेतला, यामुळे संपूर्ण दुकान जळून खाक झाले.
-अशोक चांगले
सुखापुरी : अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आगीत बिअर बार (Beer Bar), परमिट रूम जळून खाक झालीये. या आगीत विदेशी-देशी दारुसह बारमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना बुधवारी पहाटे सुखापुरी (ता. अंबड) येथे घडली.
सुखापुरी येथील दत्ता लहुराव राखुंडे यांचे पृथ्वीराज बिअर बार व परमिट रूम आहे. या बिअर बार- परमिट रूम या दुकानातील गोदामामध्ये लाईटच्या वायरीचे बुधवारी पहाटे शॉर्टसर्किट झाल्याने मोठी आग लागली.
या आगीत देशी-विदेशी दारुच्या बाटल्या फुटल्याने आगीने अधिक भडका घेतला, यामुळे संपूर्ण दुकान जळून खाक झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील नागरिकांनी प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. या घटनेमुळे राखुंडे यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची गोंदी पोलिस ठाण्यात (Gondi Police Station) नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार बाळासाहेब खवल करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.