फडणवीसांना कोरोना अन् औसेकर चिंतेत

संपर्कात आलेल्या व्यक्तींची घाबरगुंडी; सोशल मीडियावर खबदारी घेण्याच्या पोस्ट व्हायरल
corona
coronaSakal
Updated on

औसा (जि. लातूर) - शनिवार (ता. ४) रोजी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या 'शेत तेथे रस्ता' आणि 'मनरेंगातून ग्रामसमृद्धी' अभियानातील कामाचे लोकर्पण व उद्घाटन करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री बसवंत खुबा हे औशात आले होते. त्याच्या उपस्थितीत विराट शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मतदारसंघातील हजारो शेतकरी व महिला उपस्थित होत्या. मात्र आता उपस्थितांपैकी अनेकांना धास्ती लागली आहे. याचे कारण म्हणजे विरोधी पक्षनेते फडणवीस यांना कालच्या कार्यक्रमात १०२ डिग्री ताप होता आणि त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांची चिंता वाढली असून संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी व कोणाच्या संपर्कात येणे टाळावे, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे कोरोना फडणविसांना अन् चिंता औसेकरांना लागली आहे.

देशात, राज्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होतांना दिसत आहे. सरकार मास्क सक्ती करण्याच्या विचारात असतांना औशात शनिवारी झालेल्या रेकॉर्ड ब्रेक सभेचे मुख्य आकर्षण असलेले देवेंद्र फडणवीस यांनाच कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले आहे. ते औशात आले असताना त्यांना १०२ डिग्री ताप होता. त्यांना डोकेदुखीचा त्रासही मोठ्या प्रमाणात जाणवत होता. त्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली. औशाचा कार्यक्रम आटोपून त्यांनी पुढचे सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे प्रयाण केले.

आज (रविवारी) त्यांनी स्वतः ट्विट करून त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. त्यामुळे शनिवारी सभेच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तारांबळ उडाली आहे. त्याच बरोबर हे कार्यकर्ते ज्या सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात आले त्या लोकांनाही धास्ती लागली आहे. शनिवारी सकाळपासून फडणवीस लातूर, औसा शहर आणि तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील अनेक लोकांच्या संपर्कात आले होते. त्यांच्या संपर्कातील अनेक लोकं त्याच्या घरच्या व अन्य लोकांच्या संपर्कात आले असल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली आहे.

या बाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत असून खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्याद्वारे दिल्या जात आहेत. मात्र घाबरून जाण्याचे कारण नसून संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची चाचणी करून घेऊन ईतर लोकांच्या संपर्कात येऊ नये असे आवाहनही करण्यात येत आहे. एकूणच शनिवारी झालेल्या विराट सभेच्या आनंदावर या कोरोना संसर्गाने विरजण पाडले असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()