Murder : दारूच्या नशेत पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या; हत्येनंतर पतीने घेतले विषारी औषध

दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील पळसखेडा मूर्तड येथे रात्री घडली.
Sangita Sonawane
Sangita Sonawanesakal
Updated on
Summary

दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील पळसखेडा मूर्तड येथे रात्री घडली.

भोकरदन, (जिल्हा जालना) - गहू वाळविण्यासाठी सांगितलेली पट्टी का घेतली नाही या कारणाहून दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील पळसखेडा मूर्तड येथे बुधवारी (ता.एक) रात्री घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर घाबरलेल्या पतीने विषारी औषध प्राशन केले असून, पतीवर उपचार सुरू आहे. संगीता अर्जुन सोनवणे (वय 45) असे मयत महिलेचे नाव असून, अर्जुन चांगु सोनवणे (वय 55) असे विष प्राशन केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पळसखेडा मूर्तड येथील अर्जुन सोनवणे हे परिवारासह तालुक्यातील वरुड शिवारात राहत होते. अर्जुन याला दारूचे व्यसन जडल्याने घरात नेहमी वादविवाद होत होते. बुधवारी संगीताबाई या मुलासह अंगणात गहू वाळवत असतांना दारू पिऊन आलेल्या अर्जुनने मी सांगितलेली पट्टी का घेतली नाही असं म्हणत या कारणाहून पत्नी सोबत वादावाद सुरू केला. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर दारूच्या नशेत तरर्र असणाऱ्या अर्जुनने त्याची पत्नी संगीता हिच्या डोक्यात दगड घातला. घटनेनंतर अर्जुन घटनास्थळाहून पसार झाला.

जखमी अवस्थेत संगीताबाई यांना सिल्लोड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह घाटी रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर गुरुवारी (ता.दोन) सकाळी अर्जुन सोनवणे याने विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीसांत मयत महिलेचा भाऊ संजय गावंडे यांच्या तक्रारीहून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बजरंग कुटूंबरे हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.