Dhangar Community Agitation : बिडकीन येथे धनगर समाजाचे वतीने पायी रॅली काढत रास्तारोको आंदोलन; महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर

पंढरपूर, नेवासा, लातुर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाचे वतीने बिडकीन येथे आज (ता. २३) सोमवार रोजी सकाळी ११ वाजता पायी रॅली काढत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
Dhangar Community Agitation
Dhangar Community Agitationsakal
Updated on

- रविंद्र गायकवाड

बिडकीन - अनुसुचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पंढरपूर, नेवासा, लातुर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाचे वतीने बिडकीन येथे आज (ता. २३) सोमवार रोजी सकाळी ११ वाजता पायी रॅली काढत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रास्तारोको दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी सकल धनगर समाजाचे वतीने तलाठी सचिन काशिकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धनगडांचे जातीचे दाखले रद्द करा असा जीआर काढावा, अनुसुचित जमातीच्या एस टि प्रवर्गात समाविष्ट करणे, अभ्यास समितीची स्थापना करणे आदींसह विविध मागण्यांचे निवेदन सहीनीशी देण्यात आले होते.

यावेळी बिडकीन सरपंच अशोक धर्मे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश धर्मे, सामाजिक कार्यकर्ते, गणेश काळे, शेकटा माजी पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब खंडागळे, लाखेगाव सरपंच ज्ञानेश्वर रहाटवाडे, लक्ष्मण रहाटवाडे, चितेगाव उपसरपंच बसवेश्वर नजन, धुपखेडा सरपंच भागचंद भालेकर, बोकुडजळगाव ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कोल्हे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश बनसोडे, रामेश्वर रिठे, श्रीमंत मंडलिक, मंगलबाई धर्मे, उषा धर्में, चंद्रकला कर्डिले, द्वारकाबाई धर्मे, सविता कोरडे, लक्ष्मीबाई कोरडे, परीगाबाई गाढे, कल्पना धर्में, छाया धर्मे, साकरबाई पंडीत, मंदाबाई भालेकर आदींसह बिडकिन व परिसरातील समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

यावेळी‌ पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे, अशोक माने, सहायक फौजदार निकाळजे, पोलिस कर्मचारी बनगे, बल्लाळ, कदम, ढवळे, बनकर आदींसह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.