Osmanabad |'महावितरण'च्या कार्यालयासमोर भाजपचे चक्काजाम आंदोलन

महाआघाडी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
BJP Agitation In Osmanabad
BJP Agitation In Osmanabadesakal
Updated on

उस्मानाबाद : महावितरण कंपनीने (Mahavitaran) सुरू केलेली सक्तीची वीज वसुली थांबवावी, या मागणीसाठी भाजपच्या (BJP) वतीने शुक्रवारी (ता.तीन) महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कार्यकर्ते ट्रॅक्टर घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महाआघाडी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कृषी पंपाच्या वीजबिलाचा भरणा करावा, यासाठी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडले जात आहे. विशेष म्हणजे रोहित्रच बंद केला जात आहे. तर काही ठिकाणी फिडरही बंद पाडले (Osmanabad) जात आहेत. त्यामुळे शेतावर अंधाराचे साम्राज्य पसरत आहेत. यातून चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढत आहेत. वीज कंपनीने थकबाकी वसुलीची मोहिम राबविली आहे. यामध्ये काही शेतकरी बिलाचा भरणा करीत आहेत.

BJP Agitation In Osmanabad
ST कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई? मेस्मा कायदा लावण्याची शक्यता

मात्र वितरण रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून सरसकट सर्वच शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जात आहे. याचा निषेध म्हणून भाजपच्या वतीने शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालय जक्काजाम आंदोलन केले. जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला हेक्टरी १० हजार रुपयांची मदत मिळालेली नाही. हा खोटारडेपणा आहे. शेतकरी पीक विम्यापासूनही वंचित आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवायचे अन् दुसरीकडे सक्तीने वीजबील वसुली करायची, ही भूमिका शेतकरी विरोधी आहे. आंदोलनात आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, विद्यमान उपाध्यक्ष ॲड. नितीन भोसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, प्रदीप शिंदे, रमेश रणदिवे, अमर बाकले, प्रशांत रणदिवे, राजसिंहा राजेनिंबाळकर, रामदास काळगे, इंद्रजीत देवकते, ओम नाईकवाडी, सतीश दंडनाईक, विजय शिंगाडे, आनंद कंदले, राहुल काकडे, अर्चना अंबुरे, पूजा देडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()