Pankaja Munde Rajyasabha : वाघिणीसारखेच जगेन! राज्यसभेच्या चर्चेवरून पंकजा मुंडे यांनी दिलं स्पष्टीकरण

पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण; शिरूर कासार तालुक्यात पक्षाच्या ‘गाव चलो अभियाना’त सहभाग
bjp leader pankaja munde over election rajya sabha beed
bjp leader pankaja munde over election rajya sabha beed Sakal
Updated on

Beed News : विधान परिषद, राज्यसभा निवडणूक लागली की आपले नाव नेहमी चर्चेत येते. त्यामुळे यात मला काही नावीन्य वाटत नाही. आपण अनेक दिवसांपासून पदाच्या प्रतिक्षेत असल्याचे लोकांना, माध्यमांना वाटते. अनेकजण राज्यसभा, विधान परिषदेचे सदस्य होऊन गेले. त्या हिशोबाने आपले नाव येते.

आता तीन पक्षांचे सरकार असल्याने सहाजिकच आपल्याला मतदारसंघ राहिला नाही. त्यामुळे आपले नाव चर्चेत आले त्याला आपण काय, करणार असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या.

विविध राज्यांच्या विधानसभा सदस्यांमधून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ५६ जागांची निवडणूक काही दिवसांनी होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून भाजपकडून राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत आहे.

त्यांचे नाव चर्चेत येण्याचे कारण खुद्द पंकजा मुंडे यांनीच सांगितले. भाजपच्या गाव चलो अभियानात त्यांनी सहभाग घेतला. शिरूर कासार तालुक्यातील पौंडूळ ग्रामस्थांशी रविवारी (ता. ११) त्यांनी संवाद साधून सरकारच्या विविध योजनांचा ऊहापोह केला.

दिवार लेखनातही त्यांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी श्री क्षेत्र नारायणगडावर जाऊन त्यांनी नगद नारायण महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच, गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्याशीही संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, पण, लोकांना आपल्याला कुठे पाहायला आवडेल हे महत्त्वाचे आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, प्रा. देविदास नागरगोजे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

वाघिणीसारखेच जगेन!

नरेंद्र मोदी संघर्ष व गरिबीतून पुढे आलेलं नेतृत्व आहे. त्यांना या वर्गाविषयी आस्था आहे, म्हणूनच गेल्या दहा वर्षांत गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना राबवून देशात रामराज्य आणलं. प्रेम आणि विश्वासाचा वर्षाव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मला वाघीण म्हटलं आहे तर पुढेही वाघिणीसारखेच जगेन, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.