परभणी ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार महिलांच्या अत्याचारांच्या घटना रोखण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत परभणीत भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता.12) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. त्याच बरोबर वसमत रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करून सरकारच्या कार्यपध्दतीचा निषेध नोंदविला.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनाची मालिका सुरु झाली असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. जपच्या परभणी महानगर शाखेच्यावतीने सोमवारी (ता. 12) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
पोलिसांकडून भाजपच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात
या दुदैवी घटनाच्या विरोधात राज्य सरकार आवाज उठवितांना दिसत नाही असा आरोप भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी केला. राज्यातील अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महिलांच्या संरक्षणाची जबबादारी गांभीर्याने पार पाडली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, ही निदर्शने करतांना पोलिसांकडून भाजपच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत होते.
आंदोलनात यांचा होता सहभाग
या आंदोलनात आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगराध्यक्ष आनंद भरोसे, सुरेश भुमरे, डॉ. विद्या चौधरी, मंगल मुदगलकर, मोहन कुलकर्णी, मधुकर गव्हाणे, नंदकुमार दरक, डी.जी.देशमुख, संतोष जाधव, दिनेश नरवाडकर, सुप्रिया कुलकर्णी, माधवी घोडके, छाया मोगले, रितेश जैन, संजय रिझवाणी, सुशांत सोळके, अनंता गिरी, माधवी घोडके आदीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ग्रामीण शाखेच्यावतीने रस्तारोको आंदोलन
याच मागणीसाठी भाजप ग्रामीण शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मेघना बोर्डीकर व जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली वसमत रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर सोडून दिले.
महिलांमध्ये प्रचंड रोष
बलात्कारांच्या घटनाचाही राजकारणासाठी सोईस्कर वापर करण्यात येत आहे. या घटनाबाबत महिलांमध्ये प्रचंड रोष आहे. हाथरस येथील घटना घडल्यानंतर राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात आली. परंतू गेल्या सहा महिण्यात राज्यात कितीतरी मुली व महिलावर अन्याय झाले आहेत. त्याचे कुठले ही सोयरसुतक या सरकारला नाही. त्यामुळे मी या सरकारच्या कार्यपध्दतीचा निषेध करते.
- मेघना बोर्डीकर, आमदार, भाजप
गेल्या सहा महिण्यात या घटनामध्ये वाढ
राज्य सरकार महिलांच्या अत्याचारांच्या घटना रोखण्यात अपयशी ठरले आहे. राज्यात गेल्या सहा महिण्यात या घटनामध्ये वाढ झाली आहे. याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.
- डॉ. सुभाष कदम, जिल्हाध्यक्ष, भाजप ग्रामीण परभणी
सरकार अपयशी ठरले आहे
आघाडी सरकारने महिलांच्या अत्याचाराच्या घटनाबाबत सातत्याने दुर्लक्ष केले आहे. या दुर्लक्षामुळे राज्यात महिलांवरील अन्यायाच्या घटना सातत्याने वाढत जात आहेत. त्या रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.
- आनंद भरोसे, महानगराध्यक्ष, भाजप, परभणी
संपादन - प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.