पाथरी : देशाची प्रगती ही अर्थ कारणावर अवलंबून असते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश आर्थिक सक्षम केला आहे. भविष्यात भारत देश विश्वगुरू झाला पाहिजे, असा संकल्प भाजपा सरकारने केला असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड हे मंगळवारी (ता. २६) तालुक्यातील सिमुरगव्हान येथे एक कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांची पाथरीत पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, माजी आमदार मोहन फड, प्रदेश प्रवक्ता डॉ. उमेश देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, प्रा. पी. डी. पाटील. विलास बाबर, शिवराज नाईक, सुभाष आंबट, तालुकाध्यक्ष पांडुरंग नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कराड म्हणाले, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने अनेक महत्वाचे व देश हिताचे प्रश्न मार्गी लावले आहेत, तर देशवासियांना सक्षम बनविण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. याचीच माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विकसित संकल्प यात्रा सुरू आहे. पूर्वी काश्मीरमध्ये जवानांवर हल्ले होत होते ते आता बंद झाले असून काश्मीर शांत आहे.
जगभरात भारताची गरीब देश अशी ओळख होती, ती पुसून आता एक विकसित भारत म्हणून देशाची ओळख झाली आहे. ८० कोटी लोकांना मोफत राशन दिले जाते, तर आयुष्यमान भारत योजनेतून मोठमोठे ऑपरेशन मोफत होत आहेत. २०१४ पूर्वी बँकेत खाते काढण्यासाठी ५०० रुपये लागत होते ते आता लागत नाहीत.
शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. एक रुपयात विमा योजना, किसान क्रेडिट योजना आदी योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. विकसित संकल्प यात्रेद्वारे नागरिकांना माहिती देण्यासह गॅस, आयुष्यमान कार्ड वाटप केले जात असून शासनाच्या या योजनेचा कार्यक्रम कोणीही थांबवू नये, असे आवाहन ही केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.