‘अवकाळी’चा रब्बी पिकांसह तुरीला फटका

Nanded News
Nanded News
Updated on

नांदेड : नववर्षाच्या सुरुवात जिल्ह्यात अवकाळी पावसाने झाली आहे. त्यामुळे अगोदरच संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला असून, हाताशी आलेली तूरीला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शिवाय रब्बी पिकेही धोक्यात येण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जिल्ह्यात सलग तीन दिवसापासुन सुरु असलेला पाऊस गुरुवारी (ता. दोन जानेवारी) जोरदार झाला. या पावसामुळे किनवट तालुक्यातील मांडवी मंडळात अतिवृष्टी झाली. यासोबतच माहूर, धर्माबाद, देगलूर, बिलोली, हिमायतनगर, अर्धापूर, भोकर, हदगाव या तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. अवेळी पावसाचा फटका रब्बीतील पिकांसह कपाशी व तुरीला बसला आहे. शुक्रवारी (ता. तीन) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण १४५.१२ मिलीमीटरप्रमाणे सरासरी ९.०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासुन ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले होते. अशातच नववर्षाच्या प्रारंभापासूनच पावसाला सुरवात झाली. सलग तीन दिवसापासून अवेळी पावसाने झोडपून काढल्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांची धावपळ झाली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. या पावसाचा फटका वेचणीच्या कपाशीला तसेच काढणीला आलेल्या तुरीला बसला. या सोबतच हरभरा, गहू, करडी व रब्बी ज्वारी या पिकांनाही थंडी कमी झाल्याने परिणाम झाला आहे. या पावसाचा जोर विदर्भालगतच्या माहूर व किनवट तालुक्यात अधिक होता. या पावसामुळे किनवट तालुक्यातील मांडवी मंडळात चोवीस तासात ६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.     
 
मंडळनिहाय झालेला पाऊस (पाऊस मिलीमीटरमध्ये)
मांडवी ६८, वाइ ५४, सिंदखेड ४३, माहूर ३५, वानोळा १३, किनवट ३२,  दहेली पाच, शिवणी सहा, पिंपरखेड पाच, आष्टी सात, हदगाव व तामसा नऊ, मनाठा १०, अर्धापूर आठ, दाभड सहा, मालेगाव १५, बारड सात, मुगट तीन, जांब दहा, मुक्रमाबाद १६, जवळगाव १७, हिमायतनगर सहा, सरसम व सोनखेड पाच, धर्माबाद १५, जारीकोट १८, भोकर १६, देगलूर २३, मरखेड २९, गोळेगाव १५, खानापूर ११, करखेली १२, किनी नऊ मिलीमीटर  

हे देखील वाचाचसिंचन विहीरींकड शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
 
सलग तीन दिवस पाऊस 
जिल्ह्यात सलग तीन दिवसापासून अवेळी पाऊस होत आहे. ता. बुधवारी (ता. एक) एकूण २१.०९ मिलीमीटरप्रमाणे सरासरी १.३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर गुरुवारी (ता. तीन) एकूण ११.०६ मिलीमीटरनुसार सरासरी ०.७३ मिलीमीटर पाऊस झाला. यानंतर पावसाचा जोर वाढून शुक्रवारी (ता. तीन) एकूण १४५.१२ मिलीमीटरनुसार सरासरी ९.०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
  
शुक्रवारी सकाळपर्यंत तालुकानिहाय झालेला पाऊस (पाऊस मिलीमीटरमध्ये)
नांदेड ५.७५, बिलोली नऊ, मुखेड ५.१४, कंधार शुन्य, लोहा १.१७, हदगाव ६.२९, भोकर सात, देगलूर १६, किनवट १५.८६, मुदखेड ३.३३, हिमायतनगर ९.३३, माहूर ३६.२५, धर्माबाद १५.३३, उमरी पाच, अर्धापूर ९.६७, नायगाव शुन्य. एकूण १४५ मिलीमीटर तर सरासरी ९.०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.