राज्यात आघाडी सेलूत मात्र बिघाडी !

राज्यात आघाडी सेलूत मात्र बिघाडी !
Updated on
Summary

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राज्याच्या आघाडी शासनात आरूढ असलेल्या आपापल्या नेत्यांच्या मदतीने येथील बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ आणण्याचा सपाटा लावला आहे.

सेलू (परभणी) : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीन पक्षाचे सरकार आहे. मात्र अनेक जिल्ह्यात या तीन पक्षातील पदाधिकार्‍यांचे एकमत होत नसल्याने राज्यातील शासनाची डोकेदूखी वाढत आहे. त्यातच परभणी जिल्ह्यात मात्र या आघाडीत चांगलीच बिघाडी झाल्याचे चित्र सेलू बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळाच्या बदलावरून पहावयास मिळत आहे. (Board of Cellu Market Committee parbhani mahavikas aaghadi leaders)

राज्यात आघाडी सेलूत मात्र बिघाडी !
जवान जीजाभाऊ मोहितेचा पठाणकोट येथे मृत्यू; परभणी जिल्ह्यावर शोककळा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे निर्विवाद वर्चस्व असले तरी येथील बाजार समितीच्या कारभारात अनियमितता आढळून आल्यानंतर भाजपाचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या ताब्यातील बाजार समितीचे संचालक मंडळ जानेवारीमध्ये प्रशासनाने बरखास्त केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राज्याच्या आघाडी शासनात आरूढ असलेल्या आपापल्या नेत्यांच्या मदतीने येथील बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ आणण्याचा सपाटा लावला आहे.

राज्यात आघाडी सेलूत मात्र बिघाडी !
परभणी : गावकऱ्यांच्या वतीने मोरेगाव येथे २० खाटांचे मोफत कोरोना सेंटर

प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसने येथील बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नियुक्त केले. परंतु त्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना स्थान नसल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकीय मंडळीच्यावतीने आधीचे प्रशासकीय मंडळ रद्द करून शिवसेनेचे प्रशासकीय मंडळ आणण्यात यश मिळविले. माजी आमदार विजय भांबळे आणि खासदार संजय जाधव यांनी यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. नुकतेच शिवसेनेचे प्रशासकीय मंडळ कार्यरत झाले. मात्र त्यांचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांची उपस्थिती भविष्यातील जिल्ह्याच्या राजकारणाचे संकेत देत आहे. यामुळे हे तरी प्रशासकीय मंडळ कायम राहिल काय? अशी चर्चा सेलू परिसरात होताना दिसत आहे.

राज्यात आघाडी सेलूत मात्र बिघाडी !
परभणी शहरात 'आरटीपीसीआर' टेस्टमुळे अनेकांची लसीकरणाकडे पाठ

सेलू बाजार समिती प्रशासकीय मुख्यप्रशासक पदासाठी गेल्या तीन महिन्यापासून जिल्ह्यातील दोन नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादी काॅग्रेस, शिवसेना यांच्यामध्ये नेहमीच एकमेकांची कुरघोडी केली जात आहे. राज्यात महाविकास विकास आघाडीने ढोल वाजवून सत्ता स्थापन केली. मात्र परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीत नेहमीच बिघाडीचे चित्र मतदार राजा पाहत आहे. येथील बाजार समितीचे चित्र जरा वेगळेच झाले आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव, नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुकेश बोराडे, डॉ.संजय रोडगे यांनी एकत्र येत शिवसेनेच्या मुख्यप्रशासक म्हणून नव्याने नियुक्त झालेल्या रणजित गजमल यांचा सत्कार केला आहे.

राज्यात आघाडी सेलूत मात्र बिघाडी !
परभणी : लसीकरणाची पुरवठ्याअभावी कासवगतीने वाटचाल

आमदार दुर्राणी यांची उपस्थिती चर्चेचा विषय...

शिवसेनेचे खाखदार संजय जाधव व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यात कधी काळी टोकाचे मतभेद होते. परंतु (ता.२८) रोजी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली प्रशासक मंडळाने बाजार समितीचा पदभार घेतल्यानंतर खासदार जाधव यांच्या उपस्थितीत आमदार दुर्राणी यांनी या प्रशासकांचा सत्कार केला. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आमदार दुर्राणी व माजी आमदार भांबळे यांचे सरळ सरळ दोन गट पडल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे.

(Board of Cellu Market Committee parbhani mahavikas aaghadi leaders)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.