Sillod News : स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वादामुळे मृतदेहावर ग्रामपंचायत कार्यालयासमोर केले अंत्यसंस्कार

मरणानंतर देखिल मृतदेहाची यातना संपेना म्हणण्याची आली वेळ; गोळेगाव बुद्रूक येथिल घटना.
cremation
cremationsakal
Updated on

सिल्लोड - स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा अनेक वर्षांपासून वाद सुरू असल्याने काही शेतकऱ्यांनी रस्ता अडविला आहे. यामुळे हैराण झालेल्या गोळेगाव बुद्रूक (ता.सिल्लोड) येथिल काही नागरिकांनी गोळेगाव बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यसंस्कार केले.

हि घटना बुधवार (ता.09) रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. यामुळे गावासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती अशी की, या गावातील लक्ष्मण रायभान गव्हाणे (वय.75) यांचे मंगळवार (ता.08) रोजी निधन झाले. त्यांच्या समाजासाठी असलेल्या स्मशानभूमीच्या जागेचा मागील काही वर्षांपुर्वी वाद सुरू होता. त्यानंतर समोपचाराने हा वाद मिटविण्यात आला.

स्मशानभूमीच्या जागेकडे जाणारा रस्ता काही नागरिकांनी अडविल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे कोठे असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे बुधवारी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. घडलेल्या घटनेमुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठा जमाव जमला होता.

महसूल प्रशासनास याची माहिती देण्यात आली. परंतु मृतदेहावर ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आल्यामुळे मरणानंतर देखिल मृतदेहाच्या यातना संपेना अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली असल्याची परिस्थिती गोळेगाव बुद्रूक येथे बघावयास मिळाली.

महसूल विभागाने रस्त्याची हद्द कायम करून द्यावी, ग्रामपंचायत कार्यालय रोजगार हमी योजनेतून सदरील रस्त्याचे काम करण्यास तयार आहे.

- सादिया कैसर देशमुख, सरपंच, ग्रामपंचायत गोळेगाव बुद्रूक (ता. सिल्लोड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.