Beed Parli Highway Traffic Update
परळी वैजनाथ : तालुक्यातील पांगरी येथील वाण नदीवरील तात्पुरत्या स्वरूपाचा तयार करण्यात आलेला पूल वाहून गेल्याने परळी-महामार्ग बंद झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. ऐन पावसाळ्यात गुत्तेदाराने काम सुरु केल्याने व चुकीच्या नियोजनामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.