धक्कादायक! उस्मानाबादमध्ये आढळला जळालेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह

सध्यातरी हा कोणाचा मृतदेह आहे याची माहिती मिळालेली नसून फक्त घडलेला प्रकार पोलिसांनी खरा असल्याचे सांगितले आहे
Osmanabad
OsmanabadOsmanabad
Updated on

उस्मानाबाद: शहरापासून जवळच असलेल्या ग्रीनलँड शाळेशेजारील परिसरामध्ये एक जळालेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह सापडला आहे (crime news in osmanabad). मृतदेह गाडीमध्ये असून गाडीसह जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सध्या पोलिस अधिक्षक राजतिलक रौशन यांनी सध्यातरी तपास सुरू असून हा मृतदेह स्थानिक भागातील असल्याची फक्त माहिती दिली आहे. ही घटना दुपारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी (Osmanabad police) घटनास्थळाला भेट दिली असून त्यानंतर तिथे छावणीचे स्वरुप आल्याचे दिसून येत होते.

सध्यातरी हा कोणाचा मृतदेह आहे याची माहिती मिळालेली नसून फक्त घडलेला प्रकार पोलिसांनी खरा असल्याचे सांगितले आहे. इंडीका गाडीमध्ये एका पुरुषाला जाळून टाकण्याचा हा प्रयत्न असावा असे सध्यातरी परिस्थितीवरुन दिसत आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी असा प्रकार केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मयताचा खून करुन गाडीमध्ये टाकून जाळण्यात आले असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Osmanabad
उमरग्यात संचारबंदीचे आदेश धुडकावणारे दहा दुकाने सील

या सगळ्या प्रकाराने पोलिसांच्या समोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. सध्यातरी पोलिसांनी आपली तपासयंत्रणा कामाला लावली असून मयताची ओळख पटवून त्यांच्याबाबत सगळी माहिती घेण्यात येत आहे.सध्या नाव जाहीर केले नसले तरी लवकरच माहिती सांगण्यात येईल असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.

Osmanabad
अक्षरशः कोरोनाला लोळवलं! वय ९८, स्कोअर १८ अन् ऑक्सिजन ७० होता तरीही जगण्याची जिद्द होती...

या परिस्थितीमध्ये काहीच माहिती देता येणार नाही, काही धागेदोरे लागल्यानंतर ही माहिती देऊ असे पोलिस अधिक्षक राजतिलक रौशन यांनी दै.सकाळला दिली आहे. घटनास्थळावर मोठी गर्दी असून पोलिसांनी गर्दीतील कोणालाही जवळ येऊ दिलेले नाही. सध्या गाडी जळत असल्याचे चित्र दिसत असून आतील व्यक्ती पूर्ण जळालेली असल्याचे छायाचित्र बाहेर आले आहे. त्या फोटोवरुन तर मयताची ओळख पटणे देखील अवगड असल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.