Accident News : बस-कंटेनरच्या धडकेत तेरा प्रवासी जखमी चालक गंभीर

पुण्याकडून छत्रपती संभाजीनगरमार्गे भुसावळला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला.
Bus Accident
Bus Accidentsakal
Updated on

वाळूजमहानगर : पुण्याकडून छत्रपती संभाजीनगरमार्गे भुसावळला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात चालक आणि वाहकासह बसमधील तेरा प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात शुक्रवारी (ता. सात) पहाटे ४.४५ वाजल्याच्या सुमारास वाळूजच्या बजाज मटेरियल गेटसमोर झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी ः एसटी महामंडळाची बस (एमएच २०, बीएल-३४५४) पुण्याकडून वाळूज, छत्रपती संभाजीनगरमार्गे भुसावळला जात होती. बसमध्ये जवळजवळ २० प्रवासी होते. ही बस वाळूजजवळील बजाज कंपनीच्या मटेरियल गेटसमोर येताच अज्ञात कंटेनर आणि बस यांच्या भीषण अपघात झाला.

अपघातात बसमधील ५ वर्षाच्या मुलासह प्रवीण पैठणकर (२८, रा.लोहगाव), शालिनी म्हस्के (४२ रा.सुला ता. मेहकर जि. बुलढाणा), सुनील म्हस्के (४५, रा. कृष्णानगर, पुणे), सुप्रिया झुंबर गायकवाड (१९), सुनिता झुंबर गायकवाड (३५), झुंबर सूर्यभान गायकवाड (५०) हे तीघे (रा. तळवट बोरगाव, ता. गेवराई जि. बीड), समाधान प्रल्हाद सोनवणे (४३, रा. पहुर), कृष्णा तांबे (२६, रा. सिडको), प्रवीण सुरेश बनकर (३०), श्रेयस बनकर (५४) हे दोघे (रा. संसारनगर क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर), बस चालक श्याम जगन्नाथ चौधरी (रा. जामनेर, जळगाव) असे १३ जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेचे पायलट राजू रोकडे, डॉ. सुशील राऊत यांच्यासह एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी घाटीतून आलेल्या माहितीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली.

पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामचंद्र बिघोत करीत आहेत. अपघातस्थळी उपचार बजाज मटेरियल गेटसमोर बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमी रुग्णांवर रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील राऊत यांनी प्राथमिक उपचार करून रुग्णांना पुढील उपचारार्थ घाटीत दाखल केले. या कामी रुग्णवाहिका चालक राजू रोकडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.