Accident News : मेव्हण्याच्या तेरवीहून परतणाऱ्या दाजीवर काळाचा घाला बस दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू

भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून दुपारी त्यांच्यावर दहेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले
bus two wheeler accident one killed traffic police hospital jalna
bus two wheeler accident one killed traffic police hospital jalnaesakal
Updated on

भोकरदन (जिल्हा जालना) : मेव्हण्याच्या तेरवीहून परतणाऱ्या दाजीचा बस-दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना (ता.24) बुधवारी सकाळी आठ वाजेदरम्यान भोकरदन जाफराबाद मुख्य रस्त्यावरील आन्वा पाटीजवळ घडली. दिलीप शेणफड बावस्कर (36) रा.दहेड (ता.भोकरदन) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

bus two wheeler accident one killed traffic police hospital jalna
Jalgaon Accident News : दुचाकी घसरून चालकाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील दहेड येथील दिलीप बावस्कर यांची भोकरदन तालुक्यातील ईटा ही सासुरवाडी असून, काही दिवसांपूर्वी त्यांच्या साल्याचे निधन झाले होते. त्यामुळे मंगळवारी त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम होता.

bus two wheeler accident one killed traffic police hospital jalna
Accident News: जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात! मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटल्याने सहा जणांचा मृत्यू, तर...

हा कार्यक्रम आटोपून बुधवारी सकाळी ते दुचाकीने घराकडे येत असतांना भोकरदन शहराजवळील आन्वा पाटीजवळ असलेल्या शरद ट्रॅक्टर्ससमोर मलकापूरहून पुण्याकडे निघालेल्या भरधाव एस.टी. महामंडळाच्या बस व त्यांच्या दुचाकीची समोरा-समोर जोराची धडक झाली.

या अपघातात दिलीप बावस्कर यांचा जागीच मृत्यू झाला. भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून दुपारी त्यांच्यावर दहेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()