Georai Accident : कारने दुचाकीला धडक दिल्याने तीन दुचाकीस्वार गंभीर जखमी; जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक

कार चालकांनी समोरुन येणा-या दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गेवराईत घडली.
Accident
Accidentsakal
Updated on

जातेगाव (जि. बीड) - कार चालकांनी समोरुन येणा-या दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गेवराईत घडली असून, जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती आहे.

बीड-जालना राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई (जि. बीड) शहरातील एका पुलाजवळ शहागड कडुन भरधाव वेगात येणा-या विस्टा कारने समोरुन येत असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात एकामागोमाग असलेले तिन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनीवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

अपघातातील जखमी दुचाकीस्वार यांना गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती आहे.

कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे अपघात स्थळी मदतीला आलेल्या नागरीकांनी सांगीतले. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आपघातात जखमींची नावे पोलीस अन् डॉक्टर यांच्याशी संपर्क झाला नसल्याने उपलब्ध झाली नाहीत. पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.