नांदेड : मॉर्नींग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण अनोळखी दुचाकीस्वार चोरांनी जबरीने चोरून नेले. ही घटना पारसनगर भागात बुधवारी (ता. ११) डिसेंबरच्या सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. मात्र या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
शहराच्या पारसनगर मधील कोठारी कॉमप्लेक्समध्ये राहणाऱ्या रमा महेश राठी (वय ३४) ह्या पारसनगर भागात बुधवारी (ता. ११) सकाळी फेरफटका मारत होत्या. त्या पारसनगरमधील एका गल्लीत गेल्या असता त्यांच्या मागावर असलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी पाठीमागून जावून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे शॉर्ट गंठण जबरीने तोडून घेऊन अनोळखी तीन चोरट्यांनी पोबारा केला. क्षणात घडलेल्या या घटनेमुळे श्रीमती राठी यांना जबर धक्का बसला. यांनी घडलेला प्रकार आपल्या घरी जावून सांगितला. मात्र दुसऱ्या दिवसी रमा राठी यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अनोळखी तिन चोरट्याविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. वाहूळे करीत आहेत.
हेही वाचा --काय आहे बंजारा हस्तशिल्प कला..? जाणून घ्या..
सांगवीतील पोलिस चौकीचे भुमीपुजन
नांदेड : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तिन सांगवीच्या कामगार पुतळा परिसरात नवीन पोलिस चौकीचे भूमिपूजन नगरसेवक प्रतिनिधी श्याम कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे, श्री गुरु गोविंदसिंग विमानतळचे व्यवस्थापक श्रीकांत पद्मे, इंजि. रामदास कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सांगवी व परिसर येथील लोकसंख्या जवळपास १२ हजारहून अधिक आहे. तसेच या भागात सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अतिमहत्वाचे विमानतळ व रेल्वेचे विभागीय कार्यालय आहे. तसेच लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शेजारी राष्ट्रीय महामार्ग आहे. सांगवी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पोलीस चौकीची मागणी ही बऱ्याच दिवसापासून होती. काही दिवसापूर्वी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी याठिकाणी पोलीस चौकी बांधण्यास हिरवा कंदिल दाखवला. महानगरपालिकेने या ठिकाणी जागा द्यावी असी मागणी श्याम कोकाटे यांनी केली. लगेच दोन दिवसात महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेविका करूणा भिमराव कोकाटे यांनी पोलीस चौकीच्या उभारणीचा ठराव मंजूर करून घेतला. ही पोलीस चौकी शारदा कन्स्ट्रक्शनचे मालक सुमित मोरगे बांधून देणार आहेत.
हे होते उपस्थित
पोलीस चौकीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रभागातील माजी नगरसेवक नागोराव बुक्तरे, प्रकाश कदम, विनायक कोकाटे, भीमराव बोंढारे, शिवाजी पवार, संतोष कोकाटे, दाजीबा कोकाटे, सत्यवान अंभोरे, शिवाजी कोकाटे, गजानन कोकाटे, निखिल बनसोडे, गणेश कोकाटे, समाधान व इतर नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.