सावधान...एटीएमध्ये जातांना घ्या काळजी

file photo
file photo
Updated on

नांदेड : एसबीआय मुख्य शाखेच्या एटीएम केंद्रातून दोन अनोळखी भामट्यांनी एकाच्या खात्यातून ६० हजार रुपये आॅनलाईन परस्पर वळविले. ही घटना ता. २२ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर येथे घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अनोळखीविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील औंढानागनाथ तालुक्यात असलेल्या जवळा (बा) येथील शंकर पिराजी नरवाडे (वय ५२) हे खासगी नोकरी करतो. आईच्या उपचारासाठी तो नांदेडला आल्यानंतर शिवाजीनगर येथील एसबीआय या मुख्य शाखेच्या प्रांगणात असलेल्या एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी आला. तो एटीएम केंद्रात पैसे काढत असतांना त्याच्या पाठीमागे दोघेजण थांबले होते. शंकर नरवाडे हे पैसे काढत असतांना त्यांनी श्री. नरवाडे यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले. ते बाजूला सरकताच या दोघांनी एटीएम केंद्राचा ताबा घेतला. त्यांनी श्री. नरवाडे यांच्या बँक खात्यातून एकवेळेस २० हजार आणि काही वेळाने पुन्हा ४० हजार असा ६० हजार रुपयाचा व्यवहार परस्पर आॅनलाईनद्वारे आपल्या खात्यात वळविले. 

रुग्णालयात आलेल्या खातेदाराला फटका

रुग्णालयात गेलेल्‍या श्री. नगरवाडे यांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा संदेश आला. आपण तर फक्त दहा हजार रुयेच काढले. मग ४० व २० हडार पये कोणी काढले. याचा शोध त्याने लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी एसबीआय बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेतली. अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम तर उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता. श्री. नरवाडे यांच्या खात्यातून ६० हजार रुपये आॅनलाईन दुसऱ्या खात्यात वर्ग झाल्याचे दिसून आले. शेवटी शंकर नरवाडे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी अनोळखी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रार आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी ज्या एटीएममधून पैसे काढले त्या ठिकाणी जावून तपासणी केली. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र यात अनोळखी चोरटे स्पष्ट दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीमती पवार करीत आहेत.

एटीएमद्वारे पैसे काढतांना काळजी घ्या

नांदेड शहर व जिल्ह्यात आॅनलाईनद्वारे अनेकांचे बँक खात्यातून पैसे वळविण्यात येत आहेत. मागील काळात तर चक्क अतिरिक्त जिल्हाधिकारी खूशालसिंह परदेशी, पोलिस, शिक्षक, व्यापारी यांचे पैसे एटीएम कार्ड हॅक करून पळविले होते. असे प्रकरण घडल्यानंतर एसबीआय बँक तेवढी गंभीर असल्याचे दिसून येत नाही. उलट ज्या खातेदाराचे पैसे आॅनलाईन लंपास झाले त्या व्यक्तीलाच उलटसुलट प्रश्‍न विचारून हैराण करीत आहेत. एटीएम धारकांनी एटीएम केंद्रात पैसे काढताना फक्त आपणच असण्याची काळजी घ्या. संशयास्पद व्यक्ती आपल्या पुढे - मागे आढळून आल्यास पोलिसांना संपर्क करा.

विजयकमार मगर, पोलिस अधीक्षक, नांदेड.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.