निलंगा : शहरातील संजय हलगरकर यांच्या शेततळ्यामध्ये बुधवारी (ता. १४) रात्री आठ ते नऊ फूट लांबीची, सुमारे दोनशे किलो वजनाची मगर आढळली. वन विभागाचे पथक व सर्पमित्रांच्या सहकार्याने तीन तासांच्या प्रयत्नानंतर ही मगर पकडण्यात आली.
मगर धाराशिवच्या वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. शहरातील उदगीर मोड भागातील संजय हलगरकर यांच्या शेतात काम करणारे कासिम शेख यांना बुधवारी दुपारी शेततळ्यात मोठा प्राणी असल्याचा संशय आला. याबाबत त्यांनी मालकाला माहिती दिली. हलगरकर यांनी कळविताच पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी वन विभागाच्या पथकाला पाचारण केले.
पथकाने दोन तास पाण्यात निरीक्षण केल्यानंतर शेततळ्यात मगर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुपारी तीन वाजेपासून सायंकाळी सातपर्यंत शेततळ्यातील पाण्याचा उपसा सुरू केला, त्यावेळी मगर आढळली. रात्री आठपासून अकरा वाजेपर्यंतच्या प्रयत्नानंतर मगर पकडण्यात यश आले.
मगर एवढी मोठी होती, की तिला बांधून काबूत आणण्यासाठी सुमारे दहा ते बारा जणांना दोन तास प्रयत्न करावे लागले. पथकाने जिवाची बाजी लावून ही कामगारी केली. शेततळ्याच्या बाजूला नवीन वसाहत आहे. वेळीच मगर पकडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.