सावधान : जिल्ह्याच्या सिमाबाहेर कोरोनाचे संकट

File photo
File photo
Updated on

नांदेड : मराठवाड्यातील आठ पैकी तीन जिल्हयात अद्याप कोरोनाला शिरकाव करता आला नाही. जिल्ह्याच्या शेजारील लातुर, हिंगोली, यवतमाळ जिल्हयात कोरोनाचे रुग्ण आढळून आले  आहेत.  त्याचबरोबर जिल्ह्याच्या सिमावर्ती कर्नाटक, तेलंगणा राज्यात कोरोनाचा कहर झाला आहे. मात्र, प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे अद्याप नांदेड जिल्ह्यात कोरोना घुसखोरी 
करू शकला नसला तरी आता मात्र जिल्हावासियांना अधिक सतर्क रहावे लागणार आहे. 
 
हदगाव तालुक्यापासून अवघ्या वीस किलोमिटर अंतरावर असलेल्या यवतमाळ जिल्हयात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. श्री क्षेत्र माळेगाव (ता. लोहा) येथून अवघ्या ११ किलोमिटर अंतरावरील लातुर जिल्हयात आठ तर राजगड (किनवट) येथून अवघ्या दहा किलोमिटर अंतरावरील तेलंगणा व मरखेल (ता. देगलूर) येथून अवघ्या १६ किलोमिटर अंतरावरील  कर्नाटक राज्यात कोरोना महामारीने उच्छाद मांडला आहे. सरकारच्या लाॅकडाऊन अवाहनाला नांदेड जिल्हावासींचा प्रतिसाद आणि जिल्हा प्रशासनच्या चोख नियोजनामुळे आतापर्यंत कोरोनाला रोखता आले. असे असलेतरी खबरदारी म्हणून नागरिकांनी घरातच थांबायला हवे.

जिल्हयात एक हजार ५०० आशा,  चार हजारावर अंगणवाडी कर्मचारी,  ७०० एमनएम, दोन  हजारावर आरोग्य  कर्मचारी, आरोग्य सहाय्यक  सहय्यिका,  आरोग्य  पर्यवेक्षक यांच्यासह  सनियंत्रण  ठेवणारे वैद्यकिय अधिकारी यांच्यामार्फत घर भेटीद्वारे नारिकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तालुका वैद्यकिय अधिकार्यांमार्फत तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनास  पाठवण्यात आले.  लाॅकडावऊन कालावधीत कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण असलेल्या महानगरातून जिल्हयात आलेल्या ६८ हजार ८८१ नारिकांना होम क्वाॅरंटाई करण्यात  आले. 

होम क्वाॅरंटाईन केलेल्या नागरिकांना मोबाइल एसएमएसद्वारे जिल्हा प्रशासनाकडून घरात राहण्याचा सातत्याने सल्ला देण्यात येत आहे. शासन निर्देशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. संभाव्य काळात परिस्थितीचा सामना करण्यासाठी शहरातील विष्णुपुरी शासकीय रुग्णालय व महाविद्यालय येथे शंभर खाटी, सामान्य रुग्णालय ५० खाटी तर मुखेड येथे ५० खाटांचे कोरोना वाॅर्ड तयार करण्यात आले आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी  डाॅक्टरांना अवश्यक ‘पीपीई’ किट जिल्हाधिकारी डाॅ. विपीन  यांच्या मागणी नुसार शासन स्तरावरुन प्राप्त झाल्या आहेत.  लाॅकडाऊन काळामध्ये जिल्ह्यातून परप्रांतात जाणाऱ्या ५२३ नागरिकांना विविध ठिकाणी कॅम्प  सुरू आहेत.  

जिल्हा प्रशासनाने सतर्क रहात कोरोनाला जिल्ह्यात येवू न देण्याचा चंग बांधला. गेल्या बारा दिवसापासून जिल्ह्यात संचारबंदी असून जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आलेल्या आहेत. मात्र, लाॅकडाऊनच्या काळात जिल्हाबाहेरून अनेक लोक जिल्ह्यात प्रवेश करतांना पकडले जात आहेत. त्यामुळे सिमा बंद करूनही लोकांची आवक अद्याप सुरू आहे.  

जिल्ह्यात अधिक सतर्क राहण्याची चेतावणीच शेजारच्या जिल्हयांसह तेलंगणा, कर्नाटक प्रांताने  दिली आहे.  जिल्हयातील  ४४१ संशयीतांपैकी १४१ जणांचे  स्वॅप नमुने  पाठवण्यात  आले.  त्यापैकी १११ रिपोर्ट  निगेटिव्ह आले असून २५ जणांचे  रिपोर्ट प्रलंबित आहेत तर पाच जणांचे  रिपोर्ट फेटाळण्यात आले आहेत. सिमेवरील जिल्ह्यात कोरोना शिरल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असले तरी; खबरदारी हाच कोरोनावर जालिम उपाय आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.