कळंब - केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असुन सोयाबीन आयात नंतर आता केंद्र सरकारने हरभरा बाजारात येण्यापुर्वीच ऑस्ट्रेलियातुन हरभरा आयात करण्याचे धोरण राबवल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे..सद्या बाजारात सात हजार भाव असणारा हरभरा जानेवारीत आयात केल्यानंतर भारतीय हरभरा मातीमोल भावाने शेतकऱ्यांना विक्री करावा लागणार आहे. हे सरकार शेतकरी धार्जीणे नसुन शेतकऱ्यांच्या प्रपंचावर नांगर फिरवणारे, उदयोगपती धोरणी असल्याची घणाघाती टीका महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांनी केली.महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांनी प्रचारदौऱ्यात बहुला भोगजी आडसुळवाडी आढाळा आथर्डी पाथर्डी सात्रा खोंदला भाटसांगवी येथील गावांना भेटी देत कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, काँग्रेसचे अप्पासाहेब शेळके, बाजार समितीचे संचालक भारत सांगळे, हनुमंत आवाड, दिलीप पाटील आदी उपस्थित होते..आमदार कैलास पाटील शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना म्हणाले की, भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या प्रपंचावर एक प्रकारे नांगर फिरवला आहे. खते बीबियाने याचे भाव वाडवले. परंतु त्या प्रमाणात शेतकर्यांनी पिकवलेल्या शेतमालाचे भाव वाडले का ? शेतकर्यांनी याचा विचार करने गरजेचे आहे. ह्या फसव्या सरकारने गुजरात वरून लाखो टन भेसळयुक्त दुधाची बुकटी महाराष्ट्रात आणली.यामुळे दुधाचे भाव ढासळले भेसळयुक्त खवा दुध खते बीयाणे हे गुजरातवरून महाराष्ट्रात येतात व जनतेच्या आरोग्याशी खेळत आपला पैसा गुजरातला ओरबडुन नेत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. सोयाबीन हमी केंद्रावर शेतकर्यांचा एक किलो देखील माल गेला नाही..सोयाबीन केंद्रच चालु नसल्याचे सांगत तीन वर्षापासुनच सोयाबीनचे भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन ठेवले परंतु,तेल सोयाबीन पेंड ( कोंबडीखाद्य ) आयात केले. यामुळे सोयाबीनचे भाव ढासळले. शेतकऱ्यांपेक्षा कोंबड्याची काळजी करणार सरकार आहे.त्यामुळे मते देण्याच्या हे लायकीचे नाहीत.२०१४ ला फडवणीस आले आणी राज्याच राजकारण अक्षरशा नासवल त्या माणसाला हददपार करणासाठी महाविकास आघाडीला मत द्या आणी शेतकऱ्यांच हित जपणार सरकार आणा असे आवाहन कैलास पाटील यांनी केले..आथर्डी येथील शेतकऱ्याने केली पाच हजाराची मदतआमदार कैलास पाटील यांना प्रचारात गावोगावी शेतकरी गोरगरीब कष्टकरी त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणुन आर्थिक मदत करताना दिसतात. आथर्डी येथील शेतकरी शिवानंद साखरे यांनी उमेदवार कैलास पाटील यांना पाच हजाराची आर्थिक मदत केली. व कैलास दादा तुम्हीच विजयी होणार असे आशिर्वाद दिले.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.