चाकूर - बांधकाम कामगार नोंदणी कागदपत्रावर स्वाक्षरी का दिली नाही म्हणून शिवणखेड (ता. चाकूऱ) येथील दलित महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडल्या प्रकरणी एका विरूध्द अॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .शिवणखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच बायनाबाई साळूंके या गुरुवारी (ता. ८) सकाळी कार्यालयात कामकाज करीत असताना गावातील सूरज बळीराम साके हा आला व त्यांने बांधकाम कामगार नोंदणीसाठी अर्ज दाखल करावयाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यास सरपंचाला सांगितले.सरपंचांनी सदरील व्यक्ती कुठे आहेत तुम्ही त्यांची कागदपत्रे का आणलीत अशी विचारणा केली. तेव्हा साके हा रागत आला व त्यांने ग्रामपंचायतीमध्ये गोंधळा घातला. सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात बसले असताना साके याने कार्यालयास कुलुप लावून सरपंचाला तब्बल ४५ मिनीटे डांबून ठेवले..ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलुप काढण्यात आले. सरपंच बायनाबाई साळूंके यांनी याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांना दिली. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून सूरज साके याच्या विरूध्द अॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.