Beed News : बीडमध्ये १५ पासून चंपावती महोत्सव ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाकरंडकाचे आयोजन

जिल्ह्यातील बालकलाकारांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारा व बीडच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचा मानला जाणारा यंदाचा चंपावती महोत्सव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करंडक ता. १५ ते ता. २२ फेब्रुवारी असा आठ दिवस शहरात चालणार आहे.
beed
beedsakal
Updated on

बीड : जिल्ह्यातील बालकलाकारांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारा व बीडच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचा मानला जाणारा यंदाचा चंपावती महोत्सव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करंडक ता. १५ ते ता. २२ फेब्रुवारी असा आठ दिवस शहरात चालणार आहे.

यानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, समूह गीतगायन, वैयक्तिक गीतगायन, चित्रकला, फॅन्सी ड्रेस, फॅमिली डान्स अशा विविध स्पर्धा होणार आहेत. स्पर्धांची माहिती आणि वेळापत्रक संयोजकांनी शाळांमध्ये पोचविले आहे.

समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, समूह गीतगायन, वैयक्तिक गीतगायन, चित्रकला स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी असे वयोगट असतील. फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी वय पाच ते १२ असा वयोगट असेल. फॅमिली डान्ससाठी वयाचे बंधन नाही. सर्व स्पर्धा प्रकारातील सर्व वयोगटांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ तीन अशी एकूण सहा बक्षिसे दिली जातील.

beed
Natya Sammelan Beed : आता सुरू करावे लागतील मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र ; धनंजय मुंडे नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठलेही प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले नाही, अशी माहिती चंपावती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे महाकरंडक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते बहाल करण्यात येईल. याबरोबरच पाच उत्कृष्ट मुख्याध्यापक, उपक्रमशील शिक्षक, उत्कृष्ट नृत्य शिक्षक, संगीत शिक्षक, चित्रकला शिक्षक आणि बीडमधील काही कलाकारांचादेखील सन्मान करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.