अंबाजोगाई : शेतकऱ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत दोन व्यापाऱ्यांनी नागपिंपरी (ता.परळी) येथील ११ शेतकऱ्यांना तब्बल २१ लाख ६४ हजारांचा गंडा घालून फसवणूक केली. या घटनेत दोन व्यापाऱ्यांवर येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
नागपिंपरी येथील शेतकरी हनुमंत रुस्तुम मुंडे यांनी तक्रार दिली. यानुसार, अख्तर दस्तगीर पठाण (रा. कसबा पेठ, धारूर) आणि अलीम करीम शहा (रा. पात्रुड, माजलगाव) हे दोन व्यापारी त्यांच्या गावातून नेहमी कापूस खरेदी करत असतात. कापूस विक्रीमुळे मागील पाच-सहा वर्षांपासून हनुमंत मुंडे यांची या व्यापाऱ्यांसोबत ओळख झाली.
मागील वर्षी त्या दोघा व्यापाऱ्यांनी दिवाळीपर्यंत पैसे घेण्यास थांबल्यास कापसाला प्रती क्विंटल १० हजार रुपये भाव देण्याचे आमिष दाखवले. यापूर्वीच्या व्यवहारांमुळे हनुमंत मुंडे यांच्यासह ज्ञानोबा भागवत मुंडे, ज्ञानोबा किसन कोल्हापुरे, बळीराम लक्ष्मण मुंडे, आत्माराम श्रीरंग मुंडे, नवनाथ व्यंकटी शिंदे, मारोती ग्यानबा भोसले, विष्णू पाटील ढाकणे, रावण श्रीहरी मुंडे, बाबू रंगनाथ मुंडे आणि नवनाथ श्रीरंग मुंडे यांनी एप्रिल ते जून या कालावधीत एकूण २१ लाख ६४ हजार रुपये किमतीचा २२५ क्विंटल कापूस त्या व्यापाऱ्यांना विश्वासाने दिला.
मात्र, हा कापूस शहागडच्या जिनिंगला विक्री करूनही त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटूनही त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी येथील ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अख्तर दस्तगीर पठाण आणि अलीम करीम शहा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र घुगे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.