‘कोरोना’च्या गंमती-जमती : ‘कोरोना गण’ने तपासणी करा...

file photo
file photo
Updated on

सोनपेठ (जि.परभणी) : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव पिंपरी चिंचवड व पुणे या शहरात मोठ्या प्रमाणात झाल्याने त्या ठिकाणची मंडळी मोठ्या प्रमाणावर गावाकडे परतत आहेत. यामुळे अनेक गावांत काही ठिकाणी वादाचे, तर काही ठिकाणी गंमतीशीर प्रसंग घडत आहेत. 
सोनपेठ शहरातील एका व्यक्तीचा मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी होता. त्याला घ्यायला गेलेल्या वडिलांनी मुलाला थेट घरी न नेता आधी दवाखान्यात नेले. डॉक्टरांना सांगितले की, माझा मुलगा पुण्यावरून आलेला आहे, याची तपासणी करावी व त्यास ‘कोरोना’ची लागण असेल तर त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करू. ‘पुण्याची बला सोनपेठ मध्ये कशाला?’ असे म्हणताच दवाखान्यात उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू आवरले नाही.

हेही वाचा -तुराट्यांचे सरण पेटवून शेतकऱ्याने घेतली उडी...
सोनपेठ तालुक्यातील एका खेड्यात पुण्यावरून ओला उबेरचे चालक आले. ही बातमी समजताच आपल्या कुटुंबीयांना घरात बंद करून बाहेरून कुलूप लावण्याचा प्रसंग पाहावयास मिळाला. तर, गावात आलेल्या पुणेकर मंडळींना आपल्या घरापासून दूरच राहण्याचा सज्जड दमच भरला. जनता कर्फ्यूच्या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानातून औषध फवारणार असल्याची अफवा पसरल्याने अनेकांनी घराबाहेर पाऊल सुद्धा टाकले नाही. घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना घरात बसा, नाही तर अंगावर औषध पडेल म्हणून आपल्या घरात बोलावून घेतले.


ग्रामीण भागात प्रवेश देण्यावरून विरोध
ग्रामीण भागातील एका गावात पुण्यावरून पन्नासहून अधिक नागरिक आल्याने त्या गावात मोठा वादाचा प्रसंग उद्‍भवला. पुण्यावरून आलेल्या नागरिकांना गावात प्रवेश देण्यावरूनच विरोध दाखविण्यात आला. त्यावरून त्या गावातील आलेल्या नागरिकांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. परंतु, संबधित नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर हा वाद मिटला. परंतु, असे वाद गावोगाव उद्‍भवत आहेत.

चक्क भजनाचा कार्यक्रम
एका खेडेगावात तर चक्क आज जनता कर्फ्यूचा अर्थ न समजल्यामुळे त्या गावातील तीस ते चाळीस महिलांनी एकत्र येत दिवसभर गावात भजनाचा कार्यक्रमच सुरू केला. शासन नागरिकांना एकत्र येण्यापासून अनेक उपाययोजना करत आहे. मात्र, खेड्यापाड्यांतील अशिक्षित महिलांवर याचा कुठलाही परिणाम होतांना दिसत नाही. बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती देणारे फोन आरोग्य विभागातील अधिकारी तसेच प्रशासनासह पोलिसांना केले जात आहेत.

‘कोरोना गण’ने तपासणीची मागणी....
देशभर मोठमोठ्या शहरात थर्मल स्कॅनरने नागरिकांची तपासणी केली जात आहे. तसेच एक थर्मल स्कॅनर एका रुग्णालयात असल्याची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी संबंधित डॉक्टरकडे आपल्याला कोरोना गणने तपासून कोरोना झाला का ते सांगा अशी विनंती केली. डॉक्टरांनी अशी कुठलीही गण नसल्याचे सांगताच त्यांनी टेबलावर ठेवलेले थर्मल स्कॅनर दाखवून यालाच तुम्ही कोरोना गण असं म्हणत आहात. असे अनेक गंमती जमतीचे प्रसंग शहर आणि ग्रामीण भागात घडत असल्यामुळे नागरिकांना वेगवेगळा अनुभव येत आहे.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.