Chh. Sambhajinagar : मोदींच्या योजना जगात भारी; आमदार हरिभाऊ बागडे यांचा दावा

 हरिभाऊ बागडे
हरिभाऊ बागडे sakal media
Updated on

फुलंब्री : पंतप्रधान नरेंद्र मोदी काढलेली आयुष्यमान भारत ही योजना जगात नसून प्रत्येक नागरिकाच्या गंभीर आजारात केंद्र सरकार पाच लाख रुपये व राज्य सरकार पाच लाख रुपये असा एकूण दहा लाख रुपयाची मदत या योजनेतून होत असल्याने या योजनेला जगभरात पसंती दिली जात आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत हे कार्ड काढून घ्यावे असे आवाहन फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले.

 हरिभाऊ बागडे
BRS Nagpur Office : "विचारधारा बदलत नाही तोपर्यंत..." KCR यांनी कार्यकर्त्यांना दिला विजयाचा मंत्र!

फुलंब्री येथील बाजार समितीच्या सभागृहात लाभार्थी मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला. यात सुमारे दीड हजार लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, बाजार समिती सभापती अनुराधा चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष सुहास शिरसाट, माजी सदस्य जि.प. शिवाजी पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल, माजी सभापती सर्जेराव मेटे, सविता फुके, तहसीलदार डॉ. कृष्णा काणगुले, मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव, शहराध्यक्ष योगेश मिसाळ, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमासाठी डॉ. सारंग गाडेकर, राजेंद्र काळे, वाल्मीक जाधव, फारुख शेख, संजय त्रिभुवन, सांडू जाधव, अभिषेक गाडेकर, बाळासाहेब तांदळे, जगन दाढे, मयूर कोलते, सूचित बोरसे, एकनाथ धटिंग, गोपाल वाघ, रोशन अवसरमल, जनार्दन तुपे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

 हरिभाऊ बागडे
KCR : "बॅनरवर पांडुरंग अन् मटणावर ताव', उद्या विठोबाचं दर्शन अन् आज केसीआरच्या ताफ्याला मटण पार्टी

मी जनतेसाठी बसलो, काळे स्वार्थासाठी मंत्र्यांकडे बसले

जनतेचे काम कुठेही अडवू नये यासाठी लोकप्रतिनिधीने सदैव तत्पर असले पाहिजे. मागील गेल्या अनेक दिवसापासून गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारी वाढल्याने मी जनतेच्या गोरगरिबांच्या फायली मंजूर करण्यासाठी आठ तास पंचायत समिती थांबलो आणि त्या पूर्णही करून घेतल्या. परंतु माजी आमदार आघाडी सरकार असताना मंत्र्याकडे जाऊन बसले आणि कारखान्यावर स्वतःच्या मर्जीतला जालना जिल्ह्यातून प्रशासक आणून स्वार्थासाठी बसविला.

हाच फरक त्यांच्यात आणि माझ्यात आहे. त्यामुळे जनतेचे काम करण्यासाठी मी जनसामान्य माणसात मिसळून काम करतो. आजपर्यंत कुठल्याही योजनेचा मी स्वार्थासाठी फायदा केला नाही. दुसऱ्याला याचा कसा फायदा होईल या दृष्टीने प्रयत्न केले. यांनी तर स्वार्थासाठी व्यवसायासाठी बाजार समितीचे गाळे घेऊन त्यात राजकीय पक्षाचे कार्यालय थाटले, अशी टीका आमदार हरिभाऊ बागडे यांनी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यावर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.