Chhatrapati Sambhajinagar news : अपघातातील मृत टेलरच्या कुटूंबीयांना ७६ लाख भरपाई; टेम्पोच्या धडकेत झाला होता मृत्यू

Court
CourtSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : कार अपघातात मृत्यू झालेल्या टेलरच्या कुटूंबीयांना ७६ लाख २४ हजार ६६४ रुपये सहा टक्के व्याजासह देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायधिकरणाचे न्यायाधीश एस. एम. कोचे यांनी दिले आहेत.

Court
Sanjay Raut : धमकी प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक; आरोपी आमदार सुनील राऊतांचा निकटवर्ती?

अरविंद रघुनाथ ताडगे (वय ३२, रेणूका माता रोड, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) हे २८ मे रोजी रात्री दोन वाजे दरम्यान आपल्या कारने मित्रांसह पुणे- नगर असा प्रवास करत होते. शिरूर जवळ महामार्गावर त्यांच्या कारला (क्र. एमएच-१२-एनव्ही-८७८९) एका टेम्पोने (क्र.एमएच-१०-झेड-९१५७) धडक दिली. (Latest Marathi News)

या अपघातात अरविंद तागडे यांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यांचे उर्वरित मित्र जखमी झाले होते. अपघातानंतर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात ताडगे यांच्या पत्नी उषा तागडे व कुटूंबीयांनी तब्बल ९९ लाख ५६ हजार ४६७ रुपये नुकसान भरपाई मिळावी म्हणून ॲड. विकास नवाथे यांच्या मार्फत चालक- मालक आणि युनायटेड इन्शोरन्स कंपनी विरोधात दावा दाखल केला होता. (Marathi Tajya Batmya)

Court
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर, इथे पाहा डिटेल्स

अरविंद ताडगे हे व्यावसायाने टेलरिंग करत होते व त्यांचे वार्षिक उत्पन्न हे साधारण ६ लाख होते. ते कुटुंबातील प्रमुख व कर्ता असल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या उत्पान्नावर अवलंबून होता. अपघाती मृत्यू मुळे त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले. टेम्पो चालकाच्या चुकीमुळे कार चालक तागडे यांचा मृत्यू झाल्याचा युक्तीवाद ॲड. विकास नवाथे यांनी केला.

सुनावणीनंतर न्यायाधीश एस. एम. कोचे यांनी सर्व प्रकरणाचे बारकाईने अवलोकन करून ताडगे यांचा दावा अंशतः मंजूर केला व चालक, मालक व इन्सुरन्स कंपनीने संयुक्त रित्या मयताच्या वारसांना ७६ लाख २४ हजार ६६४ रुपये अर्ज दाखल केल्यापासून सहा टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.