Child Crime : एकल पालकांच्या समस्या! धाक नसल्याने लहान मुलांमध्ये वाढतेय गुन्हेगारी

Child Crime
Child Crime
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढती विधीसंघर्ष ग्रस्त (लहान मुले) गुन्हेगारीचा आलेख पाहता चाकूने हल्ला करणे, खून करण्याचा प्रयत्न करणे, बलात्कारासारखे गुन्ह्यांत बालगुन्हेगारांचे प्रमाण वाढते असल्याचे समोर आले आहे.

प्रामुख्याने खून करण्याचा प्रयत्न करण्यासारख्या गुन्ह्यात बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे अनेक गुन्ह्यातील बालगुन्हेगार हे एकल पालक आहेत, अशातच हलाखीची परिस्थिती असते, घरात वडीलधाऱ्या व्यक्तीचा धाक नसतो, त्यामुळे ही मुलं गुन्हेगारीकडे वळत असल्याचे समोर आले आहे.

Child Crime
Akola Crime : आधी पैशांसाठी ब्लॅकमेलिंग, मग शरीर सुखाची मागणी! नकार देताच महिलेवर अत्याचार

क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतही असाच एक प्रकार समोर आला. एकतानगर परिसरातील दोन बालगुन्हेगारांनी तब्बल चार दुचाकी चोरी केल्या, शहरात फिरताना ते दररोज एक दुचाकी वापरत असत, इतकेच नव्हे तर विक्री करताना चोरीच्या दुचाकी असल्याचे ओळखू येऊ म्हणून दोघा गुन्हेगारांनी दुचाकींचा रंग बदलल्याचेही उघड झाले.

दोघा गुन्हेगारांना वडील नाहीत. दोघांच्या ओळखी झाल्यापासून दोघेही चोरी करतात. दोघांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, मात्र आपली मुलं गुन्हेगारीत कशी आली, हे दोघांच्याही आईला माहित नाही.

Child Crime
Ajit Pawar: "इतकेच लोकप्रिय आहात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या"; अजित दादांचं CM शिंदेंना आव्हान

बलात्काराच्या गुन्ह्यातही अल्पवयीन मुलांचे प्रमाण

नुकताच सातारा परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्येही मुख्य संशयित हा विधीसंघर्ष बालकच असल्याचा प्रकार होता. यामध्ये बालगुन्हेगाराने मित्रांशी त्या अल्पवयीन मुलीची ओळख करुन दिली, त्यानंतर मित्राचा मित्र अशी साखळीच समोर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या गुन्ह्यातील आठवीच्या वर्गात शिकणारे दोन अल्पवयीन मुले ताब्यात घेण्यात आली आणि त्या दोघांना बालनिरीक्षणगृहात ठेवण्यात आले. यासारख्या अनेक गुन्ह्यात विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे.

सोशल मिडीयाचा गैरवापर

विशेषतः अल्पवयीन मुलांना सोशल मिडीया वापराचे पाहिजे तितके ज्ञान नाही. त्यामध्ये त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मेसेज नकळत फॉरवर्ड केला जातो. कायद्याचेही ज्ञान नसल्याने याचा पुढे काय परिणाम होईल हे ध्यानीमनीही नसताना अनेक प्रकारांना सामोरे जावे लागते. याशिवाय सोशल मिडीयावर बघून आणखी एक ट्रेंड आला तो म्हणजे तलवारीने केक कापणे. तलवारीने केक कापण्याचे प्रकार शहरात समोर आल्यानंतर यामध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई केली खरी, मात्र अल्पवयीन मुलांना करिअरविषयी सांगणारे पालकांचीही तितकीच कमी असल्याचेही समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.