Beed Crime : बालकाचा गळा दाबून खून; दाम्पत्याला जन्मठेप

सहा वर्षीय बालकाचा गळा दाबून खून केल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दाम्पत्याला दोषी ठरवत या दोघांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
court
courtsakal
Updated on

बीड - सहा वर्षीय बालकाचा गळा दाबून खून केल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दाम्पत्याला दोषी ठरवत या दोघांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (एक) श्रीमती एस. आर. पाटील यांनी हा शिक्षेचा निकाल सुनावला. देवईबाई रोहिदास सपकाळ व रोहिदास नवनाथ सपकाळ (दोघेही रा. रत्नागिरी, ता. जि. बीड) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी भावकितीलच शुभम उर्फ राज मोतीराम सपकाळ या बालकाचा ता. तीनन फेब्रुवारी २०२१ रोजी गळा दाबून खुन केला होता.

नेकनूर ठाणे हद्दीतील रत्नागिरी या गावातील मोतीरराम सपकाळ यांचा शुभम उर्फ राज हा सहा वर्षांचा मुलगा होता. आरोपी देवईबाई व तिचा पती रोहिदास हे त्यांच्या भावकीतील आहेत. घटनेपुर्वी देवबाईबाई व रोहिदास सपकाळ या दोघांनी शुभमचे आजोबा रावसाहेब सपकाळ यांच्यासोबत ‘तु करणी करून आमची म्हैस मारली होतीस’ असे म्हणून भांडण केले होते.

दरम्यान, ता. तीन फेब्रुवारी २०२१ रोजी शुभम व त्याची बहिण मित्रासोबत गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर खेळत असताना शाळेजवळ राहणाऱ्या देवईबाई व रेहिदास यांनी शुभमला घरात बोलावले व त्याचा गळा दाबुन खुन केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने त्याचे प्रेत शाळेजवळील बोळीत आणुन टाकले.

या प्रकरणी या दोघांवर नेकनूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तत्कालिन पोलिस अधिकारी लक्ष्मण केंद्रे यांनी यांनी तपास करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (एक) यांचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांच्यासमोर याची सुनावली झाली.

सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासले गेले. साक्षी, वैद्यकीय व परिस्थितीजन्य पुरावा तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने देवईबाई व रोहीदास दाम्पत्याला दोषी ठरवित जन्मठेपेसह प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल अ‍ॅड. सुहास सुलाखे, अ‍ॅड. राम बिरंगळ यांनी काम पाहिले. फिर्यादीतर्फे अ‍ॅड. मंगेश पोकळे, अमोल नाटकर यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून फौजदार बी. व्ही. जायभाये, पालिस हवालदार बबन शिंदे, अंमलदार बजरंग मुंडे, परमेश्वर सानप यांनी त्यांना सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.