झेडपीच्या सभापती पदासाठी चुरस 

file photo
file photo
Updated on

नांदेड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता लक्ष लागले आहे ते विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे. जिल्हा परिषदेत संख्याबळानुसार काँग्रसेने अध्यक्षपदी वर्चस्व कायम राखले, तर शिवसेनेला उपाध्यक्षपदाची लॉटरी लागली. संख्याबळाअभावी उपाध्यक्षपद हातचे गेल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना सत्तेत समान वाट्याचा फॉर्म्युला ठरल्याने सभापतिपदासाठी दावेदारांत चुरस निर्माण झाली आहे. सोमवारी (ता. तीन) होऊ घातलेल्या सभापती निवडीच्या अणुषंगाने मातब्बरांनी मुंबईत तळ ठोकला आहे.

राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविण्यात आला. सख्यबळानुसार अध्यक्षप काँग्रसेकडे, तर उपाध्यक्षपदाची खुर्ची शिवसेच्या ताब्यात आली. पुरेशा संख्याबळाअभावी उपाध्यक्षपद हातचे गेल्याने राष्ट्रवादीच्या गोटात असंतोष निर्माण झाला. अवघ्या दहाच्या संख्याबळानुसार पहिल्या आडीच वर्षांत राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपदासह तीन सभापतिपदे होती. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी- शिवसेनेचे संख्याबळ समान होते; पण विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचे चारने संख्याबळ कमी होऊन अवघ्या सहावर येऊन ठेपले. शिवसेनेचे मात्र खासदार प्रताप पाटील चिखलकरी यांच्या गटातील चार सदस्य शिवसेनेसोबत राहतील की नाही, या तर्कावर अखेर निवड प्रक्रियेत पडदा पडला. 

उपाध्यक्षपद हातचे गेले -
काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी केवळ एक अर्ज दाखल झाल्यानंतर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस एक, शिवसेना दोन, राष्ट्रवादी एक असे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानुसार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घटकपक्षांना सभागृहात संख्याबळ सिद्ध करण्याचा दावा केला. आधिपासूनच तयारीत असलेल्या शिवसेनेने सर्वसदस्यांना व्हिप जारी केला होता. तर शिवसेनेच्या तुलनेत संख्याबळाचा आत्मविश्वास नडल्याने हातच्या उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीला पाणी सोडावे लागले. 


दावेदारांमध्ये चुरस- 
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची कसर विषय समितीमध्ये भरून निघणार असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात येत असला तरी काँग्रेसकडून तीन सभापतिपदांवर दावा करण्यात येत आहे.यामध्ये भोकर विधानसभा, देगलूर- बिलोली विधानसभा, नांदेड - दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे काँग्रेसचे संजय बेळगे, ॲ. रामरावा नाइक, मनोहर पाटील शिंदे, गंगाप्रसाद काकडे, बाळासाहेब रावणगावकर, अरुणा कल्याणे यांच्यात सभापतिपदांची चुरस निर्माण झाली आहे. 

काँग्रेसचा तीन पदावंर दावा -
राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक गटाकडे एक सभापतिपद येण्याची जानकारांतून बोलले जात आहे. विषय समित्यांवरूनच सभापतिपदाचे दावेदार ठरविण्यात येणार असले तरी काँग्रेसकडे बांधकाम व अर्थ, शिक्षण व आरोग्य, समाज कल्याण सभापतिपदावर काँग्रेसने दावा ठोकला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला महिला व बालकल्याण, तर शिवसेनेला कृषी व पशुसंर्धन खात्यावर समाधान मानावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. 

मातब्बरांचा मुंबईत तळ - 
सूत्रांच्या माहितीनुसार  राष्ट्रवादी, शिवसनेकडूनही मलईदार खात्यांचा दावा करण्यात येत आहे. सोमवारी होऊ घातलेल्या सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दावेदारांनी मुंबईत तळ ठोकला आहे. उपाध्यक्षपद मिळाल्याने शिवसेनेच्या इच्छुकांचा हिरमोड झाला असला तरी घटकपक्षातील राष्ट्रवादी- शिवसेनेच्या मातब्बरांच्या मुंबई वाऱ्या सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.