विजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी- रुचेश जयवंशी 

file photo
file photo
Updated on

हिंगोली : भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात शनिवार  (ता. १३ ) ऑक्टोबर या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मोठ्या पावसाच्या शक्यतेचा हवामान इशारा दिला आहे. दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घटनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून स्वत: चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी केले आहे.

आकाशात विजेचा कडकडात होत असताना शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे. जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टीक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या. झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे. वीजवाहक वस्तूपासून दूर रहावे. 

अशी घ्या काळजी

आकाशात वीज चमकत असल्यास काय करु नये  पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करु नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा. विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये, झाडाखाली आश्रय घेऊ नये, दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जावे, धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करु नये.वरील उपाययोजनांचा अवलंब करुन कोसळणाऱ्या विजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

पूर परिस्थितीत खबरदारी घेण्याचे आवाहन

जिल्ह्यात जोरदार पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. सद्यस्थितीत येलदरी, सिध्देश्वर व इसापूर धरण पूर्णपणे भरले आहे. या प्रकल्पातून पाणी सोडल्यास पूर्णा व पैनगंगा नदीची पात्रे भरुन वाहू शकतात. यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या पावसामुळे कयाधू, पूर्णा व पैनगंगा नदी तसेच जवळील नाले, ओढे काठच्या गावांना पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावांतील नागरिकांनी  उपाययोजनांचा अवलंब करुन खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.